कोकाटे हादगाव तांडा येथे गावठी हातभट्टी दारुचा अड्डा उध्वस्त,आष्टीचे सपोनि सोमनाथ नरके यांची धडाकेबाज कारवाई



परतूर -- प्रतिनिधी कैलाश चव्हाण


परतूर तालुक्यातील कोकाटे हादगाव तांडा येथे आष्टी पोलिसांनी दि १४ मे रोजी सायंकाळी सहा वाजता छापा मारून गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त करून दारू नष्ट करून एका विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आष्टी पोलिसांच्या या कारवाईने अवैध धंदे चालकाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

कोकाटे हदगाव तांडा येथे  एक इसम त्याच्या घरासमोरील पत्राच्या कुडामध्ये गावठी हातभट्टी दारु तयार करून विक्री करीत असल्याची माहिती आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ नरके यांना  मिळाली तात्काळ पोलिसांचा फौजफाटा घेऊन कोकाटे हादगाव तांडा येथे खाजगी वाहनाने जावून गाड्या गावाच्या बाहेर उभ्या करुन लपतछपत मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी हातभट्टीच्या अड्डावर छापा मारला असता याठिकाणी हातभट्टी दारु तयार करण्यासाठी लागणारे गुळाचे रसायण सडवा बाळगुन, गावठी हातभट्टी दारु तयार करून तिची विना परवाना चोरटी विक्री करतांना भिमराव देवू राठोड, वय 47 वर्ष, रा. कोकाटे हादगाव याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून

अडीच हजार रुपये किमतीची दोन प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे पन्नास लीटर उग्र आबंट हातभट्टी दारु, तसेच

पाचशे रुपयांचा दोन प्लास्टीक कॅन, दहा हजार रुपयांच्या एका प्लास्टीक ड्रममध्ये अंदाजे दोनशे लीटर हातभट्टी दारु तयार करण्यासाठी बनवीलेले सडलेले गुळाचे रसायण सडवा, आणि पाचशे रुपयांचा एक ड्रम असा एकूण तेरा हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून भिमराव देवू राठोड यांच्या विरुध्द आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी आर.डी. मोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि सोमनाथ नरके, *सपोउपनिरीक्षक डी.एस जाधव,* पोकॉ राणोजी पांढरे,  पोहेकॉ  राठोड, पोकाँ. सज्जन काकडे यांनी केली आहे. या कारवाईने अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले आहेत.

Comments

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत