शेतकऱ्यांच्या बचत खात्याचे होल्ड काढून पीएम किसान सन्मान निधी व अनुदान शेतकऱ्यांना सन्मान आणि द्या - आमदार लोणीकर,आष्टी मंठा व परतुर पोलीस ठाण्यास नवीन जीप गाड्या उपलब्ध करून देण्याची आमदार लोणीकरांची पालकमंत्र्याकडे मागणी

 

परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
   गेल्या वर्षी झालेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले होते. पीक उत्पादन करण्यासाठी केलेला शेतकरी बांधवांचा खर्च ही वसूल झाला नव्हता. आणी त्यातच शेतकरी बांधवांनी व्याजाने किंवा उसने पैसे कशीबशी बी बियाणे व खताची उपलब्धता निर्माण करून शेतात पेरणी केली असून. शेतातील पिकांची नासधूस हजारो हरीण रानडुक्कर रोही व वानराच्या कळपाने माझ्या परतूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे प्रचंड नुकसान झालं असून शेतकरी पुरता वैतागला आहे. नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीमालाची तातडीने पंचनामे करून शेतीमालाचा झालेल्या नुकसानीचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याची माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हा प्रशासनास केल्या.
 शेतकरी बांधव आता गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या प्रतीक्षेत असून राज्य सरकारच्या तिजोरीतून राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी अनुदान जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांना पाठविले असून अनुदान वाटपाच्या उशीर करत कामचुकारपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यावर तातडीने कार्यवाही करून येत्या पंधरा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा करा असे प्रतिपादन आज अतिशय वादळी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या बचत खात्याला थकीत कर्जाचे कारण पुढे करून बँकेने होल्ड लावून पीएम किसान निधी अडवून ठेवलेल्या प्रकरणी प्रचंड संतप्त झालेले माजी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री महाराष्ट्र राज्य तथा परतूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांची बचत खाती गोठून पीएम किसान सन्माननिधी अडवून ठेवणाऱ्या बँकांच्या शाखा व्यवस्थापकावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत शेतकऱ्यांना त्यांची अनुदान पीएम किसान सन्मान निधी व पिक विम्याची पैसे तातडीने मिळवून द्या अशी मागणी करत जिल्हा प्रशासनास व बँक प्रशासनास धारेवर धरत केल्याने या वेळी त्यांच्या आक्रमकपणा पुन्हा पहावयास मिळाला.
 मतदार संघातील पूर्ण झालेल्या आकणी व खोराड सावगी धरणाची धार दाबायची बाकी असून लिंबेवडगाव च्या पुनर्वसन प्रकरणी तातडीने करण्याच्या कामी शासकीय स्तरावर वारंवार आढावा बैठकी घेऊन लवकरात लवकर काम पूर्ण करण्याच्या सूचना देत या कामी हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी यावेळी जिल्हाधिकारी जालना यांच्याकडे केली.
 मंठा येथील तहसील कार्यालय आयटीआय कॉलेज पंचायत समिती व कस्तुरबा गांधी विद्यालय या ठिकाणी ये जा करण्यासाठी दीडशे गावातून दररोज हजारो लोक येत जात असतात त्या कार्यालयात जाण्यासाठी पावसाळ्यात रस्ता नाही रस्त्यात खड्डे व चिखल मोठ्या प्रमाणात असल्याने कोणती ही वाहान तिकडे जात नसल्याने चिखल तुडवत पायी जावं लागत असल्याने त्या ठिकाणचा रस्ता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून करण्याची मागणी आमदार लोणीकर यांनी यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांच्याकडे लावून धरली. याबरोबरच परतूर क्रीडा संकुल ला कंपाउंड वॉल साठी निधीची मागणी तसेच मोठ्या ग्रामपंचायतींना निधीची मागणी आमदार बबनराव लोणीकरांनी लावून धरत शासकीय नवीन धोरणानुसार जास्तीत जास्त वाळू डेपो चालू करण्याच्या सूचना आमदार बबनराव लोणीकरांनी यावेळी प्रशासनास केल्या. या बरोबर च अद्यावत सुविधा नि युक्त क्रीडा संकुलाचे काम सुरू असून, सदरील क्रीडा संकुलातील जर्मन पद्धतीच्या रनिंग ट्रॅक साठी 400 मीटर जागेची गरज असून, परतुर येथील गट नं २६०/०८ मधील शेतकरी कैलास दुर्गाराम काळे ०४ आर, महादेव सीताराम काळे ०५ आर, शशिकला रामभाऊ राऊत ०९ आर अशी एकूण १८ आर जमीन संपादित करून, रनिंग ट्रॅक साठी जागा उपलब्ध करून द्यावी अशी जोरदार मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी करत आजची जिल्हा नियोजन समितीची बैठक गाजवली.
===============================
 *मंठा आष्टी व परतूर या ठिकाणी असलेल्या पोलीस स्टेशनच्या गाड्या 15 वर्षे जुन्या असल्याने या तीनही पोलीस ठाण्याच्या पोलिसांना माझ्या मतदारसंघात घडलेल्या गुन्ह्याचा तपास करताना अनेक संकटांना सामोरे जावं लागत असल्याने तातडीने या तीनही पोलीस ठाण्याना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून नवीन गाड्या घेण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी आमदार लोणीकरांनी लावून धरली असता पंधरा दिवसात गाड्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्री अतुल सावे यांनी यावेळी दिले*
===============================
 *विश्वनाथ वाघ भगवान नगर आष्टी ता.परतुर यांच्या नातू कृष्णा दत्ता वाघ वय 19 वर्ष याला 20 जुलै 2023 रोजी सकाळी 11 वाजता वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे पावसाळी दिवसात शेतातील तारा तुटून पडल्याने विजेचा झटका लागून मृत्यु झाल्याने वीज वितरण कंपनीच्या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने कार्यवाही करून सदरील मयत तरुणाच्या कुटुंबास तातडीने आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी आमदार बबनराव लोणीकर यांनी लावून धरल्याने लवकरच याबाबतीत सकारात्मक निर्णय होईल अशी ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अतुल सावे यांनी दिली.*

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....