नळडोह येथे नवीन 33 के.व्ही वीज उपकेंद्र उभारणी करिता आग्रही मागणी करणार आमदार बबनराव लोणीकर, संत जनार्दन महाराजांच्या आश्रमात नवीन सभागृह मंजुरीसाठी प्रयत्न करणार - आमदार बबनराव लोणीकर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथरावजी शिंदे 
उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे आणि प्रत्यक्ष भेटून विनंती करून नळडोह येथे नवीन 33 के.व्ही वीज उपकेंद्र उभारणी करिता आग्रही मागणी करणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केले ते नळडोह तालुका मंठा येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात आयोजित भागवत सप्ताह निमित्त महाआरतीच्या प्रसंगी उपस्थित भाविक भक्तांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
 नळडोह तालुका मंठा जिल्हा जालना येथील संत जनार्दन स्वामी महाराजांच्या आश्रमात सालाबादाप्रमाणे याही वर्षी भव्य भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून या सप्ताहाची उद्या सांगता होत असल्याने आज राज्याची माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर साहेब यांच्या शुभहस्ते महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भाजपा मंठा तालुका अध्यक्ष सतीश निर्वळ कैलासराव बोराडे, प्रा. प्रसादराव गडदे, भागवत पोटे, शिवाजी वायाळ विलास घोडके, पांडुरंग काळे, अशोकआप्पा सोनटक्के शिवाजी वायाळ नवनाथ चट्टे पंकज राठोड बाबाजी जाधव श्रीरंग देशमुख बाळू काळे काणपत थोरात गोविंद देशमुख भागवत पोटे, बाजीराव आघाव यांच्या सह गावातील तसेच परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
 पुढे बोलताना आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की यापूर्वी आपण या ठिकाणी 25 लक्ष रुपये किंमत असलेले सभागृह मंजूर करून आणून पूर्ण केले असून परिसरातील भाविक भक्तांनी केलेल्या आग्रहामुळे लवकरच नवीन सभागृह येथे बांधण्याचा आपला मानस असून त्या दृष्टीने आपण सातत्याने प्रयत्न करणार आहोत. शेतकरी बांधवांच्या शेतीच्या वीज पंपाचा कायमचा विजेचा प्रश्न सोडविण्याकरिता यापूर्वी ही आपण ते 33 के व्ही वीज वितरण उपकेंद्र या ठिकाणी मंजूर करून आणले होते. परंतु या ठिकाणी जागा उपलब्ध न झाल्यामुळे. ते वीज उपकेंद्र देवगाव खवणे या गावी पूर्ण करण्यात आले असून लवकरच आपण पाठपुरावा करून नवीन 33 के व्ही वीज उपकेंद्र मंजूर करून आनु. संत जनार्दन महाराजांचा मी भक्त असून दरवर्षी सप्ताहाच्या सांगता सोहळ्यातील कीर्तनास उपस्थित राहत असतो. परंतु यावर्षी उद्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त मराठवाडा विभागीय स्तरावरील मंत्रिमंडळाच्या बैठकीचे आयोजन असल्याने त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मतदारसंघातील विविध विकास कामा ना मंजुरी घेण्याकरिता उपस्थित राहायचे असल्यामुळे सांगता सोहळ्यास उपस्थित राहता येणार नसल्याची खंत मनामध्ये वर्षभर राहील.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश