सण उत्सवाच्या च्या पार्श्वभूमीवर शहरात व परिसरामध्ये शांतता व सुव्यवस्था आबादित राहण्यासाठी परतूर पोलिसांनी केली २१० गुंड लोकांवर प्रतिबंध कारवाई.

परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 परतुर शहरात व परीसारामधे  येणाऱ्या सण उत्सवा दरम्यान शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी एकूण २१० लोकांवर परतूर पोलिसांनी  प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून त्यामधे 
१) सीसीआरपीसी कलम १४४(२) प्रमाणे -२१ इसमावर 
२) मुंबई कायदा कलम ५६ प्रमाणे - ११ इसमाना २ वर्षा करिता जालना जिल्ह्यातून बाहेर हद्दपार करण्यासाठी 
३) सीआरपीसि कलम ११०(ई)(ग) प्रमाणे-२० लोकांवर धोकादायक आणि गुंड इसम 
४) सीआरपीसी १०७ प्रमाणे चांगली वर्तणूक ठेवणे साठी -४८ लोकांवर 
५) सरायत अवैध दारू विक्री करणारे -८ इसम यांचेवर कलम - ९३ मुंबई दारूबंदी कायदा प्रमाणे कारवाई केली आहे. 
६) सीआरपीसी कलम १५९ प्रमाणे 
- १०७ लोकांवर  . अशा एकूण - २१० पैकी काहीचे प्रस्ताव पाठवीण्यात आले तर  काही वर  प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे
 गणपती विसर्जन मिरवणूक दरम्यान प्रत्येक चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार असून, वॉच टॉवर उभारून त्यावर व्हिडिओ कॅमेरे तसेच ड्रोन कॅमेरा द्वारे संपूर्ण मिरवणुकीचे चित्रीकरण करण्यात येणार आहे, प्रत्येक मंडळाचे तसेच लोकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक एम. टी. सुरवसे (पोलिस स्टेशन परतूर) यांनी सांगितले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी