पाटोदा येथील श्री समर्थ विद्यालयात पर्यावरण संवर्धन मंडळाची स्थापणा

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
पाटोदा [ माव ] ता.परतुर येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात पर्यावरण संरक्षण व संवर्धन मंडळाची स्थापणा करण्यात आली
   एक आक्टोबर पासुन सुरु असलेल्या स्वच्छता पंधरवाडा निमित्त विद्यालयात विवीध ऊपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
 दोन आक्टोबर रोजी सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी व स्व. लालबहादुर शास्त्रीजींच्या जयंती निमीत्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
  दरम्यान पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचे महत्व व त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी करावयाचा कृतीकार्यक्रम मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी समजुन सांगितला.
  विवीध तेरा विभागात व एकशे एक मुद्यांवर आधारीत पर्यावरण संरक्षण व संवर्धनाचा हा ऊपक्रम वर्षभर विद्यालयात सुरु राहणार असल्याचे त्यांनी सांगितले .

शाळेतील हरीत सेना विभागाचे वतीने या संपुर्ण कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

सुत्रसंचालन चत्रभुज खवल प्रास्विक धनंजय जोशी यांनी केले. रोकडे पाराजी व सातपुते विद्यानंद यांनी मार्गदर्शन केले. सर्व कर्मचारी व विद्यार्थी ऊपस्थीत होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड