सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

वाढोना येथे पाच टक्के निधी वाटप -अशोक तनपुरे

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    तालुक्यातील वाढोना येथे दिनांक 6 / 10 / 23 रोजी पाच टक्के निधी  दिव्यांगान  वाटप करण्यात आला
वाढोना येथे दिव्यांग 15 लाभार्थी आहे एकूण  दिव्यांग निधी तेरा हजार शंभर रुपये  असून समप्रमाणात दिव्यांगाच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आला 
    वाढोना ही ग्रामपंचायत गेली सात वर्षापासून निधी वाटप करीत आहे या निधी वाटपासाठी अशोक तनपुरे (जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना) यांचे मोलाचे सहकार्य असते  जिल्ह्यातील एकमेव वाढोना ग्रामपंचायत आशी  आहे जी दिव्यांगाना दरवर्षी पाच टक्के निधी वाटप करीतआहे असे अशोक तनपुरे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली             यावेळी अशोक तनपुरे (जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना) वाढोना गावचे सरपंच बाळासाहेब तनपुरे , ग्रामसेवक . गजभरे  ग्रामपंचायत ऑपरेटर दिपक तनपुरे यांचे दिव्यांग बांधवांनी आभार मानले व आनंद व्यक्त केला
      या प्रसंगी दिव्यांग बांधव अशोक तनपुरे ,संगीता शेळके, दिगंबर , योगेश शेळके, कांताबाई शेळके, वरद पांचाळ, रामजी शेळके, भगवान शेळके , अहिरे श्रीपती साळवे निलावती थिटे विजयमाला साळवे अशोक गोंडे साक्षी शेळके विष्णू शेळके या सर्वांना समप्रमाणात बँक खात्यात निधी वर्ग करण्यात आला अशी माहिती  ग्रामसेवक  गजभरे  व सरपंच बाळासाहेब तनपुरे यांनी दिली
यावेळी ग्रामपंचायत सदस्य विकास शेळके गजानन तनपुरे गणेश शेळके आशा वर्कर मीरा पांचाळ हे प्रमुख उपस्थितीत होते कन्याकुमारी पांचाळ अशोक झोपडे बापूराव शेळके अनिरुद्ध शेळके प्रल्हाद शेळके लखन तनपुरे परमेश्वर खांदवे गजानन शेळके श्याम तनपुरे सतीश तनपुरे पांडुरंग तनपुरे बालासाहेब तनपुरे नवनाथ तनपुरे रामेश्वर शेळके व अनेक गावातील नागरिक उपस्थित होते

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत