एकच पर्व ओबीसी सर्व जय घोषणेने परतूर शहरात ओबीसी चा जोरदार शक्ति प्रदर्शन परतुरात ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा सह ठिय्या आंदोलन परतूर: शहरात मोटारसायकल रॅलीला मोठा प्रतिसादपरतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   शहरात बुधवारी ओबीसीच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन तहसील कार्यालया समोर करण्यात आले यावेळी मोठ्या संख्येने ओबीसी चा जन समुदाय उपस्थित होता.यावेळी प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. दरम्यान,शहरात रेल्वे स्थानकापासून ते तहसील कार्यालया पर्यंत भव्य असा मोटारसायकल मोर्चा काढण्यात आला यावेळी जवळपास दहा हजार दुचाकी सह अनेक पादचारी सहभागी झाले होते. यानंतर तहसील कार्यालया समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण देऊ नये तसेच ओबीसी शिष्यवृत्ती मध्ये वाढ करणे व ओबीसीची जात निहाय जनगणना करावी अशी मागणी सर्वच समाज बांधव यांनी केली. या ठिकाणी विचार मांडताना अनेकांचा एकच सूर होता की मराठा समाजाला आरक्षण द्या पण ओबीसी कोट्यातून नको असे सर्वांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. ओबीसी समाजात अनेक भटक्या विमुक्त जाती आहेत त्या आणखी आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या सक्षम नाहीत यासाठी शासनाने उपाय योजना करणे गरजेचे आहे अशा प्रतिक्रिया आल्या. सकाळी रॅली ची सुरवात मोंढा येथील रेल्वे स्टेशन परिसरातून झाली. तहसील कार्यालयात अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने हा मोर्चा पोहचला.
जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर सर्व वाहनांसाठी वाहन स्थळ ठेवले होते. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
 सकल ओबीसी बांधवांच्या या आहेत प्रमुख मागण्या
1)मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये.
2)ओबीसी प्रवर्गासाठी असलेली नॉन क्रिमीलेअर अट रद्द करण्यात यावी.
3) बिहारच्या धर्तीवर सर्व जातीची जात निहाय जनगणना त्वरित करण्यात यावी.
4)आतापर्यंत मराठवाड्यात दिलेल्या खोट्या कुणबी प्रमाणपत्राची चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी.
5)महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हास्तरावर ओबीसी विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीग्रह उभारण्यात यावे.
6) ओबीसी विकास महामंडळाला प्रति वर्ष दहा हजार कोटी रुपये देण्यात यावे.
7) ज्या व्यवसायिक अभ्यासक्रमाची शिष्यवृत्ती बंद केली आहे ती पूर्वत चालू करावी.
8) सर्व आस्थापनातील मूळ निवडीच्या प्रवर्गाचे आदेश तपासून बिंदू नामावली तयार करण्यात यावी खोटी बिंदू नामावली तयार करणाऱ्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
9) राज्याच्या अर्थसंकल्पातील निधी मंडळ आयोगाच्या शिफारसी प्रमाणे ओबीसी भटके, विमुक्त प्रवर्गावर खर्च करण्यात यावा.
10) तांडा वस्ती सुधार योजनेतील जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांची तरतूद करावी.
11) महा ज्योती विद्यार्थी संख्या वाढवून त्यांचा सारथी व बार्टी प्रमाणे आर्थिक सवलती देण्यात याव्यात.
12) सर्व आस्थापनाच्या ओबीसी vjnt प्रवर्गाच्या अनुशेषाच्या सर्व जागा भरण्यात याव्यात.
====================
ना.छगनराव भुजबळ यांच्या बद्दल मनोज जरांगे यांनी एकेरी भाषेत उल्लेख केल्याबद्दल ओबीसी समाजाच्यावतीने घोषणाबाजी करत तीव्र विरोध दर्शविला. आ. पडळकर यांच्या नावाचा जयजयकार करत पूर्ण परिसर दणाणला होता.
--===============
स्व. गोपीनाथ मुंडेची आठवन निघतच अनेक जन भावुक झाल्याचे चित्र देखील या ठिकाणी दिसून आले.
बंजारा समाजाच्या युवकांनी पारंपरिक वेशभूषा करत सर्व मोर्चाचे लक्ष्य वेधून घेतले होते संत सेवालाल महाराज यांचा जयघोष करत मोठया प्रमाणात बंजारा समाज सहभागी होता. तसेच धनगर समाज बांधवांनी ओबीसीच्या नावाने चांगभलं अशा जोरात घोषणाच्या नावाने सर्व परिसर दणाणून सोडला होता
आष्टी ,परतूर, वाटुर येथील न्हावी,परिट समाजाने आपली दुकाने बंद करून मोर्चात सहभाग नोंदवला होता. लिंगायत समाजाचे आराध्य दैवत महात्मा बसवेश्वर चौकात पूजन करत रॅली ला सुरवात.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले