सलग २५ दिवसांपासून उस्वद गावांमध्ये साखळी उपोषणमराठा आरक्षण : परिसरातील गावकऱ्यांचाही सहभाग
तळणी : प्रतिनिनिधी रवी पाटील
अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत उस्वद (ता. मंठा) येथील ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. सलग २५ दिवसांपासून हे उपोषण सुरू असून, परिसरातील गावकरी, समाजबांधव या उपोषणात सहभागी होत आहेत.
अंतरवाली सराटी येथील मराठा आंदोलकांवर झालेला गोळीबार, लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ व मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता १९ सप्टेंबरपासून उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांचे साखळी उपोषण सुरू आहे. मंगळवारी दिनांक ५ आक्टोंबर रोजी उपोषणाला २५ वा दिवस होता. या साखळी उपोषणाला तळणी, देवठाणा , कानडी , वडगाव , कोकरंबा , शिरपूर , इंचा , खोरवड , आनंदवाडी , अंभोरा शेळके , किर्तापूर व दहिफळ खंदारे यांसह मंठा तालुक्यातील विविध गावातील तसेच विविध राजकीय , सामाजिक व मराठा क्रांती मोर्चातील पदाधिकाऱ्यांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.
यांनी घेतली उपोषणकर्त्यांची भेट ...
उस्वद येथील व्यंकेश्वर संस्थानातील सभागृहात सकल मराठा समाजबांधवांच्या वतीने सुरु असलेल्या साखळी उपोषणाला परतूर- मंठा मतदारसंघाचे आ. बबनराव लोणीकर, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना महाराष्ट्र राज्य सदस्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ, शिवसेना शिंदे गटाचे मंठा तालुकाध्यक्ष उदय बोराडे, मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर वायाळ, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष नितीन सरकटे, कानडीचे प्रगतिशील शेतकरी नाना खंदारे, तळणीचे माजी उपसरपंच सुधाकर सरकटे, कानडी सरपंच कृष्णा खंदारे , सतीश सरकटे यांच्यासह अनेकांनी भेटी देऊन पाठिंबा दर्शविला.
तहसीलदार नाही आल्या मग , जिल्हाधिकारी येतील - मनोज जरांगे पाटील
उस्वद येथील साखळी उपोषणाला मंठा तहसीलदार रूपा चित्रक यांनी भेट न दिल्यामुळे संतप्त सकल मराठा उपोषणकर्त्यांनी तहसीलदारांचा निषेध केला . होता पंरतू मगळवारी राञी मंठा तहसीलदार रुपा चित्रक यानी राञीच्या वेळी उपोषण स्थळी भेट दिली श्री. मनोज जरांगे पाटील यांनी तहसीलदार नाही आल्या मग , उस्वदला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना बोलुन भेटीला पाठवतो. असं म्हणत उस्वद येथील साखळी उपोषणकर्त्याचे मनोबल वाढवले होते
14 आक्टोबर ला होणार्या जंगी सभेसाठी तळणी सह सपूर्ण परीसरात जय्यत तयारी सुरु आहे तळणी येथे तरुण घरोघरी जाऊन चौदा तारखेच्या सभेचे नियोजन करत आहे या सभेची पूर्व तयारी ची बैठक नुकतीच तळणी येथे पार पडली वाहनाचे नियोजन येणार्याची संख्या मोठी असल्याने त्या अनुषंगाने तळणी परीसरात नियोजन लावण्यात सकल मराठा समाजाचे कार्यकर्त्य व्यस्त आहे