श्री समर्थ विद्यालयात पाटोदा येथे विज्ञान मेळाव्याचे आयोजन.


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
 पाटोदा[ माव ] येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालयात बालजगत विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
  शालेय जीवनापासुन विज्ञानाची गोडी लागावी आपल्या सभोवताली दैनंदीन जीवनात निसर्गात घडणार्या प्रत्येक घटणेमागे विज्ञान असते. त्या घटणेमागील वैज्ञानिक कार्यकारणभाव समजुन घेवुन वैज्ञानिक दृष्टीकोन विकसीत होण्यासाठी विज्ञान मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे मुख्याध्यापक सुरेश पाटोदकर यांनी सांगितले .
   वैज्ञानिक प्रतिकृती - विवीध वैज्ञानिक आकृत्या काढुण विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. 
     अगस्त्या फौंडेशनचे श्री राठोडसर यांनी विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रतिकृती कशी तयार करायची हे सविस्तर सांगुन मुलांमधे प्रेरणा निर्माण केली.
 दरम्यान या विज्ञान मेळाव्यास व पालक मेळाव्यास मोठ्या संख्येने पालकवर्ग ऊपस्थीत होता.
भारत मातेचे प्रतिमापुजन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली . यशस्वीतेसाठी सर्वच कर्मचार्यांनी परीश्रम घेतले.
संस्थेचे अध्यक्ष आमदार मा. बबनरावजी लोणीकर यांच्या प्रेरणेने विज्ञान मेळावा आणि पालक मेळावा ऊत्साहात संपन्न झाला.* 

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

जालना तालुक्यातील आज्ञात व्यक्तीने पंचरंगी ध्वज पाडला, पालीसाचा फौज फाटा सह तहसीलदार दाखल, परिसरात तणाव पूर्ण वातावरण

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी