तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग , साखळी उपोषण सुरु

तळणी रवि पाटील
   मंठा तालूक्यातील तळणी येथे आज सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे तळणी परीसरातील पंधरा ते विस गांवाचा सहभाग या साखळी उपोषणात राहणार आहे अंतरवाली सराटे येथे सुरू असलेल्या . मराठा आरक्षणाच्या या लढाई ला व मनोज जरांगे याना पाठबळ मिळावे या हेतुने सकल मराठा समाज या आंदोलनात सक्रीय झाला असल्याचे उपस्थित मराठा बांधवानी सांगीतले आहे तळणी परीसरातील तळणी वडगाव शिरपूर कोकंरबा देवठाणा उस्वद कानडी इंचा टाकळखोपा वाघाळा लिबंखेडा दुधा सासखेडा किर्ला हनवतखेडा व आणखी अन्य गावांचा सहभाग या साखळी उपोषणाला राहणार आहे सुरवातीला छञपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून या साखळी उपोषणाला सुरवात करण्यात आली आहे एक मराठा कोटी मराठाच्या जयघोषाने बस स्टँन्ड परीसर दुमदुमून गेला 
 या साखळी उपोषणा सदर्भात मंठा तहसील दार पोलीस निरीक्षक याना निवेदन देण्यात आले आहे 

मराठा समाजाला जोपर्यन्त आरक्षण मिळत नाही तोपर्यन्त गावामध्ये सर्वपक्षीय नेत्याला येण्यास बंदी घालण्यात आली आहे तसा ठराव ग्रामपंचातीने घेतला आहे सकल मराठा समाज हे आंदोलन शांततेच्या मार्गाने लढत आहे सरकारने मराठा समाजाच्या भावना समजुन घेऊन कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण समाजाला द्यावे अशी मागणी या वेळी करण्यात आली तसेच मराठा समाजातील तरुणांनी आत्महत्या सारखा मार्ग स्वीकारू नये आपल्या समाजाचा इतीहास हा लढण्याचा आहे आत्महत्या सारखा चुकीचा मार्ग निवडून आपल्या स्वंकीयाना त्यामुळे आधिकच ञास होतो अशा भावना व आव्हाहन यावेळी उपस्थीत मराठ समाज बांधवानी व्यक्त केली 
या साखळी उपोषणाला सर्व स्थरातून भेट देण्यासाठी मोठी गर्दी होत आहे

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड