आष्टी या माझ्या कर्मभूमीमध्ये, शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देता आले हे माझे सौभाग्य- माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील संपूर्ण जनतेच्या आरोग्याची काळजी घेताना, आयुष्यमान भारत योजने अंतर्गत गोल्डन कार्ड, उपलब्ध करून दिल्याने सामान्य जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली असल्याचे माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
ते आष्टी ता परतूर येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते
 पुढे बोलताना ते म्हणाले की, उज्वला गॅस योजनेच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये आपण मंत्री असताना समाधान शिबिर घेतले होते जालना जिल्ह्यातील एक लाख लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न केला होता, मात्र उर्वरित लाभार्थ्यांनी उज्वला गॅस योजनेचा फायदा घेण्यासाठी पुढे यावे असे ही या वेळी बोलताना सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आज आष्टी गावाला शुद्ध पिण्याचे पाणी सोडण्याचे भाग्य मला लाभले याचा मला मनस्वी आनंद असून, ज्या गावां पासून मी माझा राजकीय प्रवास सुरू केला त्या गावाला आज मी पाणी देऊ शकलो याचा मला अभिमान असल्याचे यावेळी बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की या कार्यक्षेत्रामध्ये मी माझे राजकीय भविष्य सुरू केले होते मी कधी विचारही केला नव्हता की मी थेट मंत्री पदापर्यंत पोहोचेल परंतु आपल्या सर्वांच्या प्रेमामुळे मी थेट मंत्री झालो आणि आज, या भागातील जनतेच्या विकासाच्या समस्या सोडू शकलो याचा आनंद असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी व्यक्त केले
   पुढे बोलताना ते म्हणाले की आष्टी शहरात असलेली जिल्हा परिषद प्रशालेची शाळा त्या शाळेची जीर्ण झालेली इमारत, गेल्या अनेक दिवसापासून चा एक्ष प्रश्न होता मात्र आपण प्रयत्नपूर्वक जिल्हा नियोजन मंडळ अंतर्गत आष्टी येथील जिल्हा परिषद प्रशालेचा 10 खोल्या मंजूर करून घेतल्या असेही या वेळी बोलताना ते म्हणाले
पुढे ते म्हणाले की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभामंडप व तसेच संत रविदास नगर मध्ये सभामंडपा साठीआपण 20 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून या माध्यमातून वंचित असलेल्या माझ्या बांधवांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून येणाऱ्या काळामध्ये आपण वंचित दलित समाजासाठी सदैव काम करत राहणार असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की, 8 कोटी रुपयांच्या विकास कामाचे उद्घाटन करताना आपल्याला समाधान असून माझ्या माणसासाठी मी काहीतरी करू शकलो याचा मला सार्थ अभिमान असल्याचे यावेळी आमदार बबनराव लोणीकर यांनी सांगितले
पुढे ते म्हणाले की, माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात आष्टी गावा पासून झाली आहे आहे हे इथे आवर्जून सांगत असून, केवळ आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करू शकलो राज्याचे नेतृत्व करू शकलो असे ही या वेळी बोलतांना त्यांनी सांगितले
या वेळी भन्ते कष्पली,भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष छत्रघून कणसे, माजी ता अध्यक्ष रमेश भापकर,विलास आकात, भगवान आर्डे,सुदाम प्रधान, भगवान कांबळे, मधुकर मोरे,युवा मोर्चा जिल्हा अध्यक्ष संपत टकले, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सोळंके, बाबाराव थोरात,रामदास सोळंके,सरपंच मधुकर मोरे, रंगनाथ येवले,बबलू सातपुते , नशरूला काकड,अमोल जोशी,रफिक राज,असिफ कच्ची, सईद शेख,श्रीरंग गांजाळे,sdm प्रतिभा गोरे, संभाजी वारे उपसभापती,डीगंबरमुजमुले, सुरेश सोळंके,गजानन लोणीकर,दादाभाऊ तौर, वसंत राजबिंडे, सुनील तौर,रवी सोळंके उपसभापती, सिद्धू, सोळंके,मुरलीधर केकाण, सिद्धेश्वर केकान, परमेश्वर केकाण, रमेश थोरात,सीताराम राठोड, मुरलीभाऊ राठोड, निर्धास राठोड, शिवहारी तात्या,गणेश राठोड,चोखाजी सौदंर्य,राहुल भदर्गे,रवी लोंढे,मारोती गायकवाड, गणेश वैद, कार्यकरी अभियंता श्री गाढे,उप कार्यकारी अभियंता खोसे साहेब, उपकार्यकारी अभियंता संतोष सुगंधे, जे ई गौरव भंडे, यांच्यासह अनेकांची उपस्थिस्ती होती.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड