शेगाव पंढरपूर दिंडी मार्गा वरील पथदिवे दिवाळीपूर्वी प्रकाशमान होणार आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश ,आठ दिवसात काम सुरू करण्याचा दिला होता आमदार लोणीकर यांनी कंपनीला इशारा
प्रतिनिधी कैलाश चव्हाण
शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा व सृष्टी येथील पुलाच्या कामासह इतर कामे पूर्ण करण्यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपजिल्हाधिकारी मैत्रेवार रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी अभियंता सुनीता वनवे सुनिता वनवे,परतूर तहसीलदार प्रतिभा गोरे मंठा तहसीलदार रूपा चित्रक, वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता मठपती , मेघा कंपनीचे कंपनीचे प्रोजेक्ट मॅनेजर सत्यनारायण यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्न झाली होती
यावेळी शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील सावंगी गंगा येथील पुलाचे काम तसेच. श्रीष्टी येथील बंद असलेल्या पुलाचे काम आष्टी तालुका परतूर येथील उर्वरित काम परतुर येथील उर्वरित काम पूर्ण करण्यासंदर्भात तसेच शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील पथदिवे सुरू करण्यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी कंपनीला अल्टीमेटम दिला होता या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात झाली असून दिवाळीपूर्वी पथदिवे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आमदार लोणीकर यांनी दिली
, शेगाव पंढरपूर दिंडी मार्गाचे काम पूर्ण न झाल्या मुळे नागपूर कडून थेट सोलापूर कोल्हापूर कडे अतिशय जवळचा म मार्ग असूनही दिंडी मार्गावरून वाहतूक सुरु होऊ शकली नाही, स्थनिक वाहतूक वगळता लांब पल्ल्याच्या हेवी वाहनांना रस्ता असून ही पुलांचे कामे तसेच छोटी मोठी कामे न झाल्या मुळे या रस्त्यावरून जाता येत नव्हते. विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर कडे जाण्यासाठी हा रस्ता हा रास्ता अतिशय सोयीचा असून कमी अंतराचा आहे अंतराचा आहे उर्वरित काम त्वरित पूर्ण होणे आवश्यक होते
यासंदर्भात माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी वेळोवेळी विभागीय आयुक्त कार्यालय जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठका ही घेतल्या होत्या, कंपनीला सज्जन दम भरल्यानंतर कंपनीने ही कामे सुरू केलेली असून परतुर येथील जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालय, तसेच दिंडी मार्गामध्ये येणारी अतिक्रमण पाडण्यात आले आली आली रस्ता पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे
आमदार लोणीकर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून हा महत्त्वपूर्ण रस्ता मंजूर करून घेतला होता मात्र मेघा कंपनीने छोटी मोठी कामे अपूर्ण ठेवल्यामुळे या महामार्गावरून लांब पाल्यांच्या वाहनांना इजा करण्यास अडचणी निर्माण होत होत्या, ही गोष्ट ध्यानात आणून देत आमदार लोणीकर यांनी कंपनीला जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत चांगली धारेवर धरले होते त्यामुळे कंपनीने, कामाला पुन्हा एकदा सुरुवात केली असून युद्ध स्तरावर कंपनीने हे काम हाती घेतले आहे
दिंडी मार्गावर असलेले स्ट्रीट लाईट हे शोभेच्या वस्तू बनल्या होत्या हे लाईट सुरु करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वीज वितरण कंपनी आणि मेघा कंपनीला कडक शब्दात सूचना केल्या होत्या, त्यामुळे, शेगाव पंढरपूर दिंडी मार्गावरील लोणी, आष्टी, परतवाडी, श्रीष्टी, दैठणा, सिंगोना परतुर शहर, रोहिना, वाटुर, मंठा, ढोकसाळ,नायगाव, तळणी, आदि ठिकाणचे पथदिवे लवकरच म्हणजे दिवाळीपूर्वी सुरू होणार असल्याची माहिती आमदार बबनराव लोणीकर यांनी दिली