परतूर येथे १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांच्या प्रयत्नांना यश

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
    परतूर येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी मिळाली असून, माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले आहे
गेल्या पाच वर्षापासून माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी, परतूर येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून १०० खाटांच्या रुग्णालयाचा दर्जा परतूर ग्रामीण रुग्णालयाला मिळाला असून, यामुळे ग्रामीण भागातील जालना परभणी कडे जाणाऱ्या गंभीर रुग्णांना परतूर शहरातच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होणार आहेत अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली आहे
 पुढे या पत्रकार माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी म्हटले आहे की, परतूर येथे या सुविधा उपलब्ध नसल्यामुळे ग्रामीण भागातील रुग्णांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता, परतूर तालुक्यातून व शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात त्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जालना परभणी नांदेड हा एक महामार्ग असून दुसरा महत्त्वपूर्ण शेगाव पंढरपूर दिंडी मार्ग असल्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणावर अपघात होत असतात त्यामुळे गरजू रुग्णांना अपघातग्रस्तांनाआपले प्राण गमवावे लागत होते गंभीर अपघातामुळे थेट जालना इथपर्यंत पोहोचेपर्यंत अनेक अपघात ग्रस्थाना प्राण गमावत होते मात्र आता परतूर येथेच उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध झाल्यामुळे, गरजू रुग्णांना या गोष्टीचा मोठा फायदा मिळणार असल्याचे या पत्रकार आमदार लोणीकर यांनी नमूद केले आहे
कोरोना काळामध्ये परतुर येथे कोरोणा रुग्णांना उपचार न उपलब्ध झाल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले होते या पार्श्वभूमीवर उच्च दर्जाच्या सुविधा आता परतूर शहरात मिळणार असल्याने, सर्वसामान्य जनतेला याचा मोठा फायदा होणार असल्याचे या पत्रकात आमदार लोणीकर यांनी नमूद केले आहे
ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेला जिल्हा रुग्णालय जालना येथे जाण्यासाठी अधिक खर्चाची बाब होती, अनेकांना या गोष्टीचा खूप मोठा त्रास होत होता या पार्श्वभूमीवर गेल्या ०५ वर्षापासून आपण परतूर येथे सुसज्ज असे उपजिल्हा रुग्णालय निर्माण करण्यात यावी यासाठी प्रयत्न करत होतो आपण केलेल्या प्रयत्नाला यश आले असून, उपजिल्हा रुग्णालयाला मंजुरी दिल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांना धन्यवाद आमदार बबनराव लोणीकर यांनी दिले असून, लवकरच सर्व सुविधा परतुर उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध होतील असेही यावेळी पत्रकात आमदार लोणीकर यांनी सांगितले

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश