ऑल इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धेत परतूर च्या 24 विद्यार्थ्यांना यश,

परतूर प्रतिनीधी संतोष शर्मा   ऑल 
  इंडिया राष्ट्रीय कराटे स्पर्धा दिनांक 9 व 10 डिसें 2023 रोजी  मराठा मंदिर भवन जळगाव रोड औरंगाबाद येथे संपन्न झाल्या या स्पर्धेत परतूरच्या 24 खेळाडूना यश मिळाले
   या मधे  पायल सोपान काकडे, अक्षदा लक्ष्मण घायाळ, मनस्वी दुष्यंत इगारे, धनश्री राजेश घारे, अश्विनी दिनकर जोशी, साक्षी भारत घारे, श्रद्धा भागवत ग्राम, पूजा सुरेश गोरे, चंचल वासुदेव दाते,अनिकेत सचिन काळे, सोहम संतोष जाधव, समाधान जगन्नाथ काकडे, जगजीत सिंग बलजीत सिंग जुनी, यावरील तेरा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये मुंबई कर्नाटक आंध्र प्रदेश भुसावळ नागपूर अशा मोठ्या शहरावर व राज्यावर मात करून गोल्ड मेडल पटकावले आहे,
आकाशी अशोक खताळ, सानिका सोमेश घारे, श्रावणी सोमेश घारे, वरील तीन विद्यार्थिनींनी आपापल्या गटामध्ये अहमदनगर लातूर सांगली कोल्हापूर पुणे अशा मोठमोठ्या शहरांवर मात करून सिल्वर मेडल पटकावले आहे,
अभिषेक अशोक घारे, नेहा सोमेश निर्वळ, आरती पद्माकर घारे, साक्षी प्रकाश तांबे, गीता अशोक काकडे, कोमल सिंग तुषार सिंग पाल, यावरील सहा विद्यार्थ्यांनी आपापल्या गटात अमरावती अकोला वर्धा गडचिरोली अशा मोठमोठ्या शहरांवर मात करीत ब्रांस मेडल पटकावले आहे,
वरील सर्व विद्यार्थ्यांचे पणजी येथे होणाऱ्या आंतरराज्य राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या
   यशाबद्दल मुख्य प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव पोलीस निरीक्षक मारुती खेडकर , शिवसेना तालुकाध्यक्ष उदय  बोराडे, माजी सरपंच सुभाषराव घारे, बाळासाहेब घारे (राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष),भाजपा अध्यक्ष दुष्यत इघारे, मुख्याध्यापक  खिल्लारे डीबी, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण डुकरे आदींनी अभिनंदन केले आहे

Popular posts from this blog

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात