सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परभणी लोकसभा मतदार संघ शिवसेनेचाच आणि शिवसेनाच पुन्हा भगवा फडकणार - सुभाष साळुंखे

 
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
   परभणी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचाच आणि शिवसेनाच पुन्हा भगवा फडकणार असून मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्येही शिवसेनेचेच उमेदवार निवडून येतील असे परतुर येथील शिवदुत, बूथ प्रमुख, व शिवसेना पदाधिकारी मेळाव्या प्रसंगी परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे यांनी आपले वीचार मांडले
   परतुर येथे परतुर /मंठा विधानसभा शिवसेनेच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला असता अध्यक्ष म्हणून परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना पक्ष निरीक्षक सुभाष साळुंखे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर ,शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल, महिला आघाडी प्रमुख कालींदाताई ढगे युवा सेेेना जिल्हा प्रमुख अजय कदम हे होते. पूढे बोलताना साळुंखे म्हणाले की, परभणी लोकसभा मतदारसंघ गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचाच बालेकिल्ला आहे या ठिकाणी शिवसेनेचेच उमेदवार निवडून आलेले आहेत आणि आताही शिवसेनेचाच उमेदवार या परभणी मतदार संघाला दिला जाणार आहे यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपरिषदेचेही निवडणुकीसाठी उमेदवार दिले जातील महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना जिल्हाप्रमुख अग्रवाल यांनी केलेल्या कार्याचा आढावा सकारात्मक दिला जाईल. यांच्या कामाची पावतीही यांना मिळेल या मेळाव्यामध्ये विविध पदाधिकारी यांच्याकडून पक्ष वाढीचा आढावा ,पदाधिकारी कडून घेण्यात आला यावेळी जिल्हा संपर्कप्रमुख पंडित दादा भुतेकर जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल महिला जिल्हाप्रमुख कालींदाताई ढगे यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाचे प्रस्ताविक परतुर विधानसभा संघटक विजयकुमार गिरी यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले ,परतुर तालुका प्रमुख अमोल सुरूंग, मंठा तालुकाप्रमुख उदयसिंग बोराडे, तालुका संघटक विजयकुमार गिरी, वैद्यकीय मदत कक्षाचे विधानसभा प्रमुख शिवाजी तरवटे, शहर प्रमुख दीपक हिवाळे ,उपतालुकाप्रमुख नितीन राठोड, सोपान कातारे ,विभाग प्रमुख गजानन आकात ,सरपंच दिनकर शेंडगे ,युवासेना तालुका प्रमुख अविनाश कापसे, अल्पसंख्याक तालुकाप्रमुख शेख खाजा, नसीर खान पठाण यांनी विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शहर प्रमुख दीपक हिवाळे यांनी केले तर आभार शिवसेना वैद्यकीय कक्षाचे शिवाजी तरवटे यांनी मानले, या मेळाव्यास परतूर मंठा तालुक्यातील बुथ प्रमुख, शिवदूत व शिवसैनिक पदाधिकारी यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. यामध्ये जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून परतूर येथील शाहेद सय्यद व इतर वीस तरुणांनी प्रवेश घेतला तसेच या ठिकाणी विविध पदाधिकाऱ्यांना सुद्धा नियुक्ती पत्राचे वाटपही करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत