शिकलकरी मोहल्यातून तलवार चाकू जप्त.परतूर पोलिसांचे शहरात कोंबींग ऑपरेशन
परतूर – प्रतिंनिधी कैलाश चव्हाण
येथील शिकलकरी मोहल्ल्यात पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन राबवून दोघा जणांच्या घरातून पोलिसांनी तलवारी आणि चाकू जप्त त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी कोंबींग ऑपरेशन दरम्यान सोन्यासिंग प्रेमसिंग टाक, हरदीपसिंग हरजितसिंग जुनी दोन्ही रा. शिकलकरी मोहला परतूर यांचे घरात तलवार आणि चाकू मिळून आले आहे. या त्यांचेवर भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक शैलेस बलकवडे , उपविभागीय पोलिस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गर्शनाखाली पोलिस निरीक्षक एम.टी. सुरवसे, पोऊपनि यू.बी.चव्हाण, पोऊपनि विठ्ठल केंद्रे, पोना अशोक गाढवे, पोका ज्ञानेश्वर वाघ, पोका अच्युत चव्हाण, पोका शामूवेल गायकवाड, पोका दशरथ गोपनवाड, पोका दिपक आढे, पोका संगीता मांडे, होमगार्ड कपिल आखाडे, अर्जुन बोंडगे यांनी कारवाई केली.