गोर सेनेचा वाटूर फाट्यावर रास्ता रोको, दोन तास वाहतूक ठप्प : विमुक्त जातीतील घुसखोरी थांबविण्याची मागणीपरतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
  परतूर - विमुक्त जाती अ' प्रवर्गातील इतर जातीची घुसखोरी थांबविण्यात यावी, बनावट जात प्रमाणपत्राबाबत विशेष तपासणी पथकाची स्थापना करण्यात यावी, या इतर मागण्यांसाठी गोर सेनेच्या वतीने गुरूवारी (दि. २८) जिल्हा- नांदेड महामार्गावरील वाटूर फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक दोन तास ठप्प झाली होती.

गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण, अविनाश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी बंजारा समाजातील महिला पारंपारिक वेशभूषा धारण करून या रास्ता रोको आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. विमुक्त जाती 'अ 'प्रवर्गात अवैध मार्गाने

खोटे जात वैधता प्रमाणपत्र घेणाऱ्या लाभार्थ्यांसह खोटे प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी विशेष तपासणी पथक स्थापन करण्यात यावे, संपूर्ण महाराष्ट्रत जिल्हा ठिकाणी जिल्हा जात वैधता पडताळणी समितीम ध्ये वि.जा. (अ) प्रर्वगातील एका तज्ञ व्यक्तीची शासकीय प्रतिनिधी म्हणून नेमणूक करावी, २४ नॉव्हेबर २०१७ च्या महाराष्ट्र शासनाकडुन निर्गमित झालेला रक्त नातेसंबंधाचा निकष लावून जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा शासन निर्णय त्वरीत रद्द करण्यात यावा, संपूर्ण महाराष्ट्रात खरे राजपूत जातीचे लोक प्रत्यक्षात कुठे राहतात त्या तालुका निहाय जिल्हाची यादी शासनामार्फत त्वरीत जाहीर करण्यात यावी, राज्य मागास अहवाल
                    क्र. ४९/२०१४ लागू करण्यात यावा, महाराष्ट्र शासनाने विमुक्त भटक्या जमातीना लागु केलेली उन्नत व प्रगत गटाची अट त्वरीत रद्द करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन आंदोलकांनी जिल्हा प्रशासन तसेच राज्य शासनास सादर केले. या रास्ता रोको आंदोलनासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या रास्ता रोको आंदोलनात बंजारा समाज पाच लाख बनावट प्रमाणपत्र वाटप


बांधव महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

गर्दीतून रुग्णवाहिकेस करून दिली मोकळी वाट गोर सेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन सुरू असताना आंदोलकांनी रुग्णवाहिकेस वाट मोकळी करून देत जमलेल्या बंजारा समाज बांधवांनी म माणुसकीचे दर्शन घडवले.
                                                                        विमुक्त 'अ' प्रवर्गातून अधिकाऱ्यांना हाताशी धरून जवळपास पाच लाख प्रमाणपत्र वाटप केल्याचा आरोप गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला तसेच सरकारने गोर सेनेच्या मागण्या पूर्ण न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत हा समाज सरकारला हिसका दाखवेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती