राजेगाव येथुन तीन बैल चोरीला ,चोरीच्या घटनेने शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण
घनसावंगी -- प्रतिनिधी
तालुक्यांतील राजेगावं शिवारात शेत गट क्र. सतरा मध्ये गोठ्यात बांधलेले तीन बैल चोरीला गेल्याची घटना मंगळवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे.
शेतकरी सचिन सुरेश उगले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की राजेगांव शिवारात शेत गट क्र. 17 मधील शेतामध्ये जनावराचा गोठा आहे. तिथे जनावरे नेहमी बांधतो दी 25 डिसेंबर 2023 रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारस गोठ्यावर चक्कर मारुन घरी आले होतो. दि 26 रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतामध्ये गेलो आसता गोठ्यात बांधलेल्या तीन बैल दिसुन आले नाही. बैलाच्या गळ्यातील घागरमाळ तुटुन खाली पडलेला दिसल्या तीन बैलाचा आजुबाजुला शोध घेतला असता मिळुन आले नाही. कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी एक लाल रंगाचा, आणि दोन पाढ-या रंगाचे साठ हजार रुपये किमतीचे बैल कोणीतरी अज्ञात चोरट्याने शेतातील गोठ्यतून चोरुन घेऊन गेले आहे.
या प्रकरणी घनसावंगी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकों वैराळ हे करीत आहेत. या घटनेने शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे. बैलचोरीचा कसून तपास करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.