क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी
परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
आज आनंद इंग्लीश स्कूल मध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती गीतगायन स्पर्धा घेऊन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, एकनाथ कदम सर व प्राचार्य नारायण सागुते ,श्रीमती दिपाली हरजुळे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष एकनाथ कदम सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगातून सावित्रीबाईंच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांचे विचार आत्मसात केले पाहिजेच असे सांगितले.तसेच प्राचार्य नारायण सागुते यांनी गाण्यातुन सावित्रीबाईच्या विचारावर प्रकाश टाकला.
विद्यार्थ्यांनी अनेक समाजसुधारकांच्या जीवन चरित्रावर, देशभक्तिपर गीते, कविता सादर केल्या,आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विकास काळे यांनी केले.
याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.