जालना डीईआयसी मध्ये बाळाचे अस्थि रोग पूर्व रोगनिदान शिबिर संपन्न ....

जालना प्रतिनीधी समाधान खरात 
दि 08 रोजी जिल्हा रुग्णालय,जालना येथील डीईआयसी विभागात बाळाचे अस्थीरोग पूर्व रोग निदान जिल्हा शल्यचिकित्सक मा डॉ राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिर घेण्यात आले, 
  या शिबीरासाठी विशेष तज्ञ म्हणून SRCC हॉस्पिटल, मुंबई येथिल प्रसिद्ध बाळ अस्थीरोगतज्ञ डॉ अवि शहा होते, या शिबिरात बाळाच्या पायात हातातील बाक, पायची लांबी कमी अधिक, मणक्यातील समस्या, सेरेब्रल पालसी, आणि इतर अस्थी संबंधित बाळाची पूर्व तपासणी करण्यात आली या शिबिरासाठी एकूण 51 बालकाची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 16 बालकांना शस्त्रक्रिया साठी मुंबईतील SRCC हॉस्पिटलमध्ये विविध योजनेतून शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. या शिबिरासाठी DD विभागाचे डॉ कुलकर्णी सर, अति शल्यचिकित्सक डॉ राजेंद्र गायके,डॉ सोनी , डॉ.नितीन शहा ,डॉ. संजय मेश्राम,डॉ अंबुरे, यांची उपस्थिती होती तर शिबिर यस्वावी करण्यासाठी, डीईआयसी विभागाचे व्यवस्थपक डॉ मीनल देवळे, बालरोगतज्ज्ञ डॉ अर्चना खंडागळे, डॉ अमितकुमार जैस्वाल, डॉ सागर झंवर, डॉ गजानन खरात, राजू खिल्लारे, अरुण सुर्वे,वर्षा निर्मळ, श्रीधर सरकटे, तेजस्विनी वाघमारे, सर्व DEIC विभागाचे कर्मचारी अधिकारी ,याच बरोबर RBSK विभागाचे DPS विद्या मस्के, संदिप रगडे, डॉ विजयकुमार राठोड, डॉ अवचार,डॉ अंबडकर,डॉ दहिवाल,डॉ टाकसाळ, डॉ सोमेश राजमाने, रक्षा घुगे, तोफिक पठाण, गौरव मुंडे, भूषण भाले, सर्व RBSK विभाग कर्मचारी ,एक्स-रे विभाग, औषधी विभाग, सुरक्षा रक्षक आदि नि सहकार्य केले

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत