न्यू .वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ स्वामी विवेकानन्द यांची जयंती साजरी .

 परतूर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
दि १२/०१/२०२४ शुक्रवार रोजी न्यू . वंडर किड्स ईंग्लिश स्कुल परतूर येथे राजमाता जिजाऊ  व स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. या वेळी संस्थेच अध्यक्ष  नारायणराव सोळंके , कार्याध्यक्ष  गणेशराव सोळंके , सचिव सौ छाया बागल मॅडम सौ अश्विनी मोरे मॅडम व  सुरेश मोठे  उपस्थीत होते
    प्रमुख अतिथि म्हणून जाधव सर, भानूसे सर, निवृत्ती बिडवे सर आणि प्रिन्सिपल साम वर्घिस सर होते.  
       यावेळी राजमाता जिजाऊ बद्दल बोलताना मोरे मॅडम म्हणाल्या की, जिजामाता म्हणजे जगातील सर्व मातांसाठी एक आदर्श आहेत. त्या केवळ उत्कृष्ट माताच नाही तर उत्कृष्ट पत्नी, राजकारणी आणि अर्थतज्ञ सुध्दा होत्या. तसेच यावेळी स्वामी विवेकानंद यांच्या बद्दल बोलताना श्री मोठे सर म्हणाले कि, स्वामी विवेकानंद हे सर्व भारतीय युवकांचे प्रेरणास्थान आहे. स्वामी विवेकानंद म्हणजे ज्ञानाचा अथांग सागर होते स्वामीजींनी भारताच्या संस्कृतीची ओळख संपूर्ण जगाला पटवून दिली तसेच साता समुद्रापार भारताचे नावलौकिक केले. या कार्यक्रमाचा समारोप श्री निवृत्ती बिडवे सर यांनी जिजाऊ वंदना गाउन केला. 
   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गोविंद पाठक सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री हरकळ सर यांनी केले या प्रसंगी सर्व शिक्षक वृंद, विद्यार्थी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

सकल राजस्थानी समाज नवरात्र महोत्सवच्या अध्यक्ष पद्दी शरद भारुका तर सचिव: शुभम चित्तोडा यांची निवड