नवीन शैक्षणिक धोरणात सृजनशीलतेला महत्त्व : प्रा.डॉ. भालचंद्र वायकर
परतूर , प्रतिनिधी कैलाश चव्हाण
नवीन शैक्षणिक धोरण विदयार्थांच्या सर्वांगीण हिताचे असून , त्यांच्यामध्ये असलेल्या वेगवेगळया गुणांचा विकास करून आवडीच्या विषयात संधी व त्यांच्या मध्ये असलेल्या सृजनशीलतेला महत्त्व दिले गेले आहे. असे प्रतिपादन प्रा.डॉ. भालचंद्र वायकर अधिष्ठाता विज्ञान व तंत्रज्ञान विदयाशाखा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठ छ. संभाजीनगर यांनी केले .
येथील लालबहादूर शास्त्री महाविदयालयात दि. 25 जानेवारी ला घेण्यात आलेल्या एक दिवशीय राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चर्चासत्रात त्यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविदयालयाचे प्राचार्य तथा व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारत खंदारे यांची उपस्थिती होती. या चर्चासत्राचे उद्घाटन प्रा.डॉ. विलास खंदारे माजी व्यवस्थापन परिषद सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख उपस्थितीमध्ये प्रा.डॉ. दिलीप अर्जुने, प्राचार्य डॉ. प्रसाद मदन,डॉ. कैलाश पाथ्रीकर , उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान,प्रा. जालिदर इघारे,डॉ. शैलेंद्र शेलार , डॉ.राजेंद्र फासे ,प्रा. अनिल सोनपावले , कार्यालयीन अधीक्षक सुधाकर काटे याची उपस्थिती होती .
पुढे बोलतांना डॉ. वायकर म्हणाले , प्राध्यापकांना विदयार्थ्यांमध्ये असलेल्या कौशल्याला ओळखता आले पाहिजे. तरच त्या विद्यार्थाला न्याय मिळेल . त्यासाठी प्राध्यापकांनी सुद्धा नवीन शैक्षणिक धोरणाचा अभ्यास करून स्वतःमध्ये बदल केले पाहिजे . बदल हा निसर्गाचा नियम आहे .बदलाचा स्वीकार आपण केला पाहिजे.प्राचार्य डॉ. प्रसाद मदन यांनी नवीन शैक्षणिक धोरणात रोजगारांच्या संधी आणि युवकांचा विकास यावर आपले विचार व्यक्त केले .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ.रवी प्रधान यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सखाराम टकले यांनी केले. आभार डॉ.राजेंद्र फासे यांनी मानले. कार्यक्रमास शिक्षक , विदयार्थी, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच शहरातील शिक्षण क्षेत्रातील जाणकार व्यक्तीची उपस्थिती लक्षणीय होती.