जालना जिल्हा प्रवीण प्रशिक्षण समन्वयक संघटनेच्या जालना जिल्हाध्यक्ष पदी श्री.समाधान खरात तर महिला आघाडीतून श्रीमती ज्योती आडेकर यांची निवड.

जालना ‌प्रतीनीधी 
आज अंजनीआई फाउंडेशन यांच्या कार्यालयात जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये सर्वानुमते श्रीमती ज्योती आडेकर यांची महिला समन्वयक पदी तर श्री समाधान खरात यांची पुरुष समन्वयकपदी निवड करण्यात आली.
जिल्ह्यातील प्रवीण प्रशिक्षकांचे विविध प्रश्न कसे मार्गी लागतील, प्रवीण प्रशिक्षकांना येणाऱ्या अडचणी, जिल्ह्यातील विविध प्रशिक्षणे दर्जेदार कसे होतील याविषयी सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ प्रशिक्षक व मार्गदर्शक प्रा. राधेश्याम राजपूत सर यांची उपस्थिती होती.
या बैठकीसाठी एम.डी.सरोदे, श्रीमती मोहिनी मानकर,  रवींद्र भालेराव,श्रीमती विद्या जाधव,  जि.एस.गव्हाने, संतोष जाधव, राजू गवई,श्रीमती ज्योती आडेकर, समाधान खरात,   भास्कर उघडे, बंडू नन्नवरे, पत्रकार   विनोद काळे , संतोष जाधव , आनंद म्हस्के , प्रदीप डील्पे ,संघपाल वाहुळकर,यांच्यासह अनेक प्रवीण प्रशिक्षक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार