लालबहादूर शास्त्री महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी केला अभ्यास दौरापरतुर- प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
  लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील 84 विद्यार्थ्यांनी जालना येथील कलश सीड्स, जालना व कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी येथे दिनांक 13 जानेवारी रोजी प्रत्यक्ष पीक पाहणी केली, विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा या उद्देशाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता.
प्रात्यक्षिकामध्ये (ओपन डे) टोमॅटो, कांदा, वांगी, मिरची, कोबी, पत्ताकोबी, गाजर, सिमला, मिरची, मुळा, यांच्या विविध गुणधर्म असलेल्या वाणाचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पिक निरीक्षण करता आले, तसेच या व्यतिरिक्त विदेशी भाजीपाल्यांची उभी पिके ही विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवली.

कंपनीच्या संशोधक तज्ञाकडून विद्यार्थ्यांना नवीन पिकाचे संकरित वाण कसे तयार केले जाते याबाबत विस्तृत माहिती देण्यात आली, त्याबरोबरच सीड्स प्रक्रिया, सीड्स पॅकिंग इत्यादी विभागाला विद्यार्थ्यांनी भेट दिली.
कृषी विज्ञान केंद्र खरपुडी, या ही ठिकाणी विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील फळबाग, भाजीपाला, फुलशेती, पशुव्यवस्थापन इत्यादींची माहिती घेतली.

सदरील अभ्यास दौरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भारत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला , या करिता प्रा. डॉ दत्तात्रय राऊत व प्रा. रवींद्र जोशी यांनी या अभ्यास दौराचे नियोजन केले.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती