शिवसेना महिला आघाडीच्या ललिताताई काळदाते यांची उपजिल्हा प्रमुखपदी निवड,शिवसेना जिल्हा प्रमुख मोहन अग्रवाल यांच्या हस्ते दिले नियुक्ती पञ
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतुर तालुक्यातील आंबा येथील कणखर महीला नेतृत्व असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ललिताताई काळदाते यांची नुकतीच शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल यांनी जिल्हा कार्यालय परतूर येथे नियुक्त पत्र देऊन निवड करण्यात आली आहे.
दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे की , हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना नेते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर आणि जालना जिल्हा संपर्कप्रमुख पंडितराव भुतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व महीलाआघाडी जिल्हा प्रमुख यांच्याशी चर्चा करुन उपजिल्हाप्रमुख महिला आघाडी पदी नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे यांची शिकवण आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल असे शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्यकर्त्याला असा विश्वास आहे असे दिलेल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मोहन अग्रवाल उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब चिखले विधानसभा संघटक विजयकुमार गिरी, शहर प्रमुख दीपक हिवाळे, महिला आघाडी, तालुकाप्रमुख नीताताई घोंगडे,दलित आघाडी तालुकाप्रमुख राहुल भदर्गे, वैद्यकीय आर्थीक मदत सह कक्ष प्रमुख अशोक टेकाळे ,उपसरपंच महादेव वीर,व साहेबराव घोंगडे, उपस्थित होते.
Comments
Post a Comment