दि जालना पीपल्स बँक निवडणूक ,सचिन सांबरे यांचा विकासकुमार बागडी यांना जाहीर पाठींबा
जालना प्रतीनिधी समाधान खरात
जालना पीपल्स बँकेच्या निवडणुकीत आता कुठे रंगत येऊ लागली आहे. या निवडणूकीतील उमेदवारांना चिन्ह वाटप झाल्यानंतर प्रत्येक उमेदवाराने आपल्या प्रचारास प्रारंभ केला आहे. दरम्यान, अनुसूचित जाती जमातीचे उमेदवार विकासकुमार बागडी यांना सचिन रुपचंद सांबरे यांनी जाहीर पाठींबा दर्शविला आहे.
यावेळी खाटीक समाजाचे सामाजिक कार्यकर्ते मनोज बागडे, भुषण सांबरे, पांडुरंग शिंदे, अनिल लष्कर, कैलास गायकवाड, रवि सांबरे आदींसह असंख्य लोक व मतदार उपस्थित होते.
सांबरे यांनी केवळ पाठींबाच दर्शविला नाही तर ते आता विकासकुमार बागडी यांचा प्रचार देखील करणार असून त्यांच्या विजयासाठी आपण आपल्या जीवाचे रान करु, अशी ग्वाही सांबरे यांनी दिली आहे.
जालना पीपल्स बँक ही व्यापार्यांची बँक असली तरी या ठिकाणी सर्वसामान्य नागरीकांची कामे व्हायला पाहिजेत म्हणूनच आपण या निवडणूकीत उतरलो असल्याचे श्री. विकासकुमार बागडी यांनी म्हटले आहे.