श्रीष्टी व सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता बारा कोटी रुपये निधी मंजूर,आमदार बबनराव लोणीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश
परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण
महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री तथा परतूर विधानसभा मतदारसंघाची विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांच्याकडे गेल्या अनेक दिवसापासून सातत्याने पाठपुरावा करत निधीची मागणी केल्याने
सातोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणी कर्मचारी निवासस्थानाचे इमारती करिता सहा कोटी रुपये निधी तर श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारती करिता आणि कर्मचारी निवासस्थानी इमारती करिता सहा कोटी रुपये असा एकूण सुमारे बारा कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार यांनी राज्याचे माजी मंत्री तथा परतुर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांना पत्राद्वारे कळविले आहेत.
पन्नास वर्षांपूर्वीचे जुने बांधकाम असलेल्या या इमारती मोडकळीस आल्याने पावसाळ्यात सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पावसाळ्याची पाणी गळत होते. इमारतीच्या भिंती कधीही कोसळून पडतील अशी शक्यता निर्माण झाली होती. या ठिकाणी कर्मचाऱ्यांना निवासाची व्यवस्था नसल्याने कर्मचारी बाहेरून ये जा करत असल्याने रुग्णांना उपचार करण्यात अडचणी निर्माण होत होत्या.
जिल्ह्यातील परतुर तालुक्यातील श्रीष्टी व सातोना परिसरातील रुग्णांची आता हेळसांड थांबणार असून. अति उच्च दर्जाच्या सोयी सुविधा परिसरातील रुग्णांना येथीलच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध होणार असल्यामुळे श्रीष्टी व सातोना परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून ठीक ठिकाणी नागरिक आमदार बबनराव लोणीकर यांचे आभार माणताना दिसत आहे.
आमच्या प्रतिनिधीशी बोलताना आमदार बबनराव लोणीकर यांनी केंद्रीय स्वास्थ्य एवं परिवार कल्याण केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती प्रवीण पवार आणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे आभार मानले असून सर्वसामान्य गोरगरीब रुग्णांच्या उपचाराकरिता केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश असल्याने समाधान व्यक्त केले आहे.