प्रभू रामचंद्राचा सोहळा पाचशे वर्षा नंतर तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला आहे- ह भ प अर्जुन महाराज बादाड

तळणी प्रतिनिधी रवि पाटील
मनुष्याच्या जिवनामध्ये अनेक सोहळे आहेत तुमचे आमचे सोहळे जिवन मरणाचा सोहळा जिवाचा सोहळा आहे एक पदमीनीचा सोहळा एक सोहळा वारीचा आहे एक सोहळा नाम चितंनाचा आहे एक वैकृठ गमनाचा सोहळा आहे एक ज्ञानोबाच्या समाधीचा सोहळा आहे आणि एक प्रभू रामचद्राच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आहे जो गेल्या पाचशे दशकाच्या नंतर तुम्हा आम्हाला पाहायला मिळाला असल्याने आपण खरच भाग्यवान आहोत असे प्रतिपादन ह भ प अर्जुन महाराज बादाड यानी तळणी केले श्री संत ज्ञानेश्वर महाराज मदीर निर्माण वर्धापन दिनाचे औचित्य व प्रभू श्रीराम यांच्या प्राणप्रतिष्ठेच्या निमित्य तीन दिवसीय सप्ताह च्या दुसर्या दिवशीच्या किर्तन सेवेत बोलत होते 
जगदगुरू संत तुकाराम महाराज याच्या स्वामीकाज गुरू भक्ती पितृवचन सेवाभक्ती या अंभगावर महाराजानी निरुपण केले . स्वामी भक्ती काय असावी याचे उदाहरण म्हणजे हनुमंतराय आहे निस्वार्थ प्रभूरामचद्रांची सेवा करण्याचे परमभाग्य मारोतीरायांना मिळाले . स्वामी म्हणजे मालक .. आणि काज म्हणजे काम करणारे स्वामीची सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण मारोतीराय आहे . गुरुवर किती निष्ठा ठेवावी याचे उत्तम उदाहरण शबरी माता आहे . आणि पितृ वचन कसे पाळायचे याचे उदाहरण म्हणजे प्रभू श्रीराम .वडीलाचे वचन म्हणून चौदा वर्ष वनवास स्वीकारला म्हणुन जगात रामाचा आदर्श मोठया प्रमाणात आहे सेवाप्रती या साठी सीतामाईची साधना मोठी आहे रामाबरोबर चौदावर्ष वनवासात राहुन पतीची सेवा करणारी सीतामाता आजच्या मातासाठी आदर्शच असायला हवी तरच ती एक आदर्श माता ठरेल

सध्याच्या धकाधकीच्या काळात मनुष्याला परमार्थाक साधनेची नितात गरज आहे कारण स्वःत स्वार्थापोटी मनुष्य भरकटत चालला आहे . त्यासाठी त्याला परमार्थाक साधनेची व सहवासाची गरज आहे येणारा काळ हा आव्हानात्मक असला तरी त्याला परमार्थीक साधनेची जोड दिली तर त्याच्या आयुष्याचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही श्रीकृष्णाने अर्जुनाला केलेला उपदेश मानवी जीवनाचा कल्याण्याचा उपदेश आहे तो मनुष्याने जर स्वीकारला तर या किर्तन सार्थकी लागल्याशिवाय राहणार नाही 

मनुष्याच्या जिवनात सुखाची समाधानी कमी आहे माणसाचे जिवन जगत असताना त्याचे कर्तृत्व सिध्द करत असताना यश मिळवत असताना किवा कोणतीही क्रिया करत असताना त्यामध्ये सुख आणि समाधान महत्वाचे आहे सुख हे कोणालाच नको असे कोणी मनुष्य जिवाची धडपड ही सतत सुख कश्यात मिळेल हे शोधत असतो त्याला दुःखाची प्राप्ती कधीच होऊ नाही यासाठी जसा तो धडपडतो तसा तो भगवंत भक्ती साठी तडफडला पाहीजे तरच त्याला सुखाची प्राप्ती होईल मनुष्याच्या जिवनात सुखाची कमतरता असता तुम्ही कीतीही कर्म करा तुम्ही कितीही देव देव करा भगवतांची साधना करा तरी सुध्दा त्याला दुःख असते भगवतांचे सेवा करतो नामस्मरण करतो तरी ही त्याच्या वाट्याला दुःख का ? 

मनुष्य श्रद्धेने निष्ठेन भगवतांची सेवा करत असेल आणि तरी त्याच्या नशीबी दुःख येत असेल तर ती भगवंताची योजना समजावी कारण माझ्या भक्ताला पूढच्या जन्मी दुःखाचे कष्ठ सोसायाला नको ते याच जन्मात फेडून घ्यायचे म्हणून तो ते कर्म याच जन्मात फेडून घेत असतो म्हणून त्याला दुःखाची प्राप्ती होती मणुष्याला कर्म कधीच चुकत नसतात ते भोगावे लागतातच मनुष्य जीवनात येऊन सुखा साठी जप तप साधना व्रत वैकल्य सगळे केले कोणत्या पदवी पर्यन्त जाऊ म्हणजे मला दुःख मिळणार नाही तरी माझ्या नशीबात दुःख का मी माणूस आहे सगळ्या गोष्टी मिळतात पण सुख का मिळत नाही नेमकी कोणती गोष्ट करु म्हणजे मला सुख मिळेल असा प्रश्न जेव्हा तुकोबारायांना विचारला जातो तेव्हा तुकोबाराय म्हणतात ज्या भंगवंताचे तुम्ही चितंन श्रवण करतात ना त्याचे तुम्ही दास व्हा त्याला वाहवून घ्या तुमच्या सर्वकाळ त्याच्या चरणाशी समर्पित करा तेव्हा तुमच्या कडे सुखाची नांदी नादेल

जो सर्वकाळ भगवतांचा दास आहे त्याच्या ठिकाणी सुखाचा कल्लोळ आहे जो त्याचा दास होईल त्याच्या जवळ सुखाची साठवण तो करत असतो भगवतांच्या नाम चितणात हरवून जाणे म्हणजेच त्याचे दास होणे होय त्याचा दास होणे म्हणजे वेगळे काही नाही त्याचे चितन मनन करणे त्याचे सेवक होणे म्हणजेच दास होणे आणि दास झाल्यावर सुख हे मिळणारच आहे कारण भगवतांला ही भक्ती साधना प्रिय आहे तिचे दास्यत्व स्वीकारले की सुखाची कृपाद्रस्टी केल्याशिवाय तो थांबत नाही कारण त्याचे दास्यत्व स्वीकारले की मनुष्याच्या पूण्याच्या साठ्यात भर पडते ती ती पडली की सुखाची प्राप्ती त्याच्या पदरात पडल्याशिवाय राहत नाही

परमार्थाची सेवा आपल्या हाडात राहीली पाहीजी त्याची साधना आपल्या चितात राहीली पाहीजी म्हातारपणात गळ्यात माळी घालून उपयोग नाही परमार्थाची लथ मनुष्याला लागली तर त्याच्या कडे सुखाची प्राप्ती शिवाय दुसरे काही नसनार आहे गरज आहे त्याचे दास्यत्व स्वीकारायची तरच आणि तरच तुम्हा आम्हाला सुखाची प्राप्ती होऊन जीवनाचा उध्दार झाल्याशिवाय राहणार नाही असे महाराजांनी शेवटी सांगीतले

अयोध्या येथील प्रभू श्रीरामाचे मंदीर हे राष्ट्र मंदीर असुन अनेक कारसेवकाच्या बलीदानातून ते मिळवले आहे मोठा सघर्ष या साठी करावा लागला तंबूत राहणार्या जगाच्या मालकाचा खरा वनवास आता संपला आहे त्याला दंडवत घालण्यासाठी सवडीनुसार सर्वानी जावे असे महाराजांनी शेवटी सांगीतले

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

विकी सुपारकरच्या मारेकऱ्यांना फाशीच्या शिक्षेची मागणी

आदर्श शिक्षक दिलीप मगर यांचा गुरू माऊली आबासाहेब मोरे यांच्या हस्ते सत्कार