सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये बालिका दिन उत्साहात साजरा

   परतूर प्रतिनीधी कैलाश चव्हाण
दि. 3 जानेवारी रोजी सातोना (खु) येथिल यश प्रायमरी इंग्लिश स्कूल मध्ये सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशालेचे प्रिन्सिपल शामीर शेख हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून मंचावरती जयराम चव्हाण तसेच सावित्रीच्या लेकी म्हणून सर्व महिला शिक्षिका उपस्थित होत्या.
   सर्वप्रथम अध्यक्ष व प्रमुख अतिथींच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाईंच्या वेशभूषेत आलेल्या सर्व विद्यार्थिनींचा  उपस्थित महिला शिक्षकांचा संस्थेतर्फे भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
   कु.धनश्री बिडवे ,सुरज लिपणे, नेहा बिडवे, तन्वी पवार आणि समृद्धी होंडे या विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आपले मनोगत वक्त  केले तसेच अश्विनी कोळपे , राधिका आकात या शिक्षिकानी विद्यार्थ्यांना सावित्री बाई फुले यांच्या जीवनविषयक माहिती दिली.
  अध्यक्षीय समारोपात शेख यांनी विद्यार्थ्यांना थोर लोकांच्या जीवनातून प्रेरणा घ्यावी असा संदेश दिला.
  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख सीमा पवार यांनी तर आभार विलास गोरे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी व विद्यार्थ्ययानी प्रयत्न केले

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत