ईटीएस मोजणीचा वाळू चोरानी घेतला धसका . महसूल प्रशासनाने आता त्याना दाखावा हिसका, खड्डे बुजण्यासाठी कोल्हापूरी बंधार्यात अडवलेले पाणी सोडण्या प्रयत्न असफल


तळणी : प्रतिनिधी रवी पाटील 
  सपूर्ण पूर्णा नदी पाञातील अवैध वाळू उत्खननाची ईटीएस यञणेद्वारे मोजणी करुन वाळू चोरासहित परतूर उपविभागीय अधिकारी मंठा तहसीलदार संबंधीत मंडळ अधिकारी तलाठी पोलीस प्रशासन यांच्यावर कारवाई करा अन्यथा मंठा तहसील समोर २६ जानेवारी रोजी आत्मदहनाचा ईशारा ज्ञानेश्वर राठोड यानी दिल्यानंतरही मरगळ आलेल्या महसुल प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही हे विशेष 
   वाळू चोरी झालेल्या ठिकाणची ईटीएस द्वारे मोजणी करुन कारवाई करण्याची या निवेदनात केल्यानंतर जिल्ह्यावरून मोजणीचे पथक येणार असल्याचा संदेश वाळू चोरापर्यन्त बरोबर महसुल यञनेने दिल्या नंतर काही करा पण खडे साफ करा नाही तर कारवाई अटळ आहे व आत्मदहनाचे भूत मानगुटीवर ठाम असल्याने महसुल प्रशासन दबावात आहे . वाळू चोरी झाल्याचे खड्डे बुजवायचे कसे यावर वाळू चोरानी कमाली शक्कल लढवली खरी .परतू ती त्याच्या चांगलीचअंगलट आली .टाकळखोपा , वाघाळा या गावाच्या वरुन विदर्भातील गावाची सिमा लागते . पूर्णा नदीपाञातील विदर्भाच्या हद्दीतील वझर आघाव या बधार्याचे लावलले दरवाजे वाळू चोरांनी रात्रीच्या वेळेस काढण्याचा प्रयत्न केला शेतात असलेल्या शेतकर्याच्या ही गोष्ट लक्षात येताच इतर शेतकर्यानी त्यास कडाडून विरोध करुन दोन तीन वाळू चोरांना बांधुन ठेवण्यात आल्याचे समजले विदर्भ पोलीस प्रशासनाचा यामध्ये हस्तक्षेप झाला असला तरी आपसात या प्रकरणावर पडदा टाकला 

वझर आघाव येथील बंधार्याचे दरवाजे जर वाळू चोरांनी उघडले असते तर त्यामध्ये अडवलेले पाणी सरळ वाघाळा टाकळखोपा पर्यन्त आले असते .नदीपाञात पाणी असल्याचे कारण देऊन ईटीएस मोजणी टाळल्या गेली असती व कोटी रुपयांची वाळू चोरी गेलीच नाही हे पून्हा महसुल प्रशासनाने छाती बडवून सागीतले असते निवेदन कर्ता यानी निष्पक्ष पणे मोजणी करून संबंधीतावर कारवाई करण्याची मागणी यापूर्वीच केली आहे 

ईटीएस मोजणी करण्याचे पञ मंठा तहसील ला प्राप्त झाले असून ती केव्हा व कशी करायची हा निर्णय वरीष्ठ घेतील वाळू चोरांनी बंधार्याचे दरवाजे काढण्यासाठी प्रयत्न केल्याचे समजले असल्याचे मंडळ अधिकारी भगवान घुगे यांना सागीतले 

भगवान घुगे मंडळ अधिकारी

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....