दैठणा बु येथे शालेय व्यवस्थापन समिती ची बिनविरोध निवड.

परतुर प्रतिनीधी कैलाश चव्हाण 
परतुर तालुक्यातील दैठणा येथे सन 2023-25 साठी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची बिनविरोध निवड करण्यात आली.
मागील व्यवस्थापन समितीची मुदत संपल्याने नवीन समिती ची निवड सरपंच श्री शत्रुघ्न कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
 यामध्ये सर्वानुमते श्री पुंजाराम तुकाराम कणसे यांची अध्यक्ष म्हणून तर सौ. सीमा संतोष रेपे यांची उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.
सदस्य पदी श्री भगवान पवार, सौ मंजुश्री भगवान बे, श्री भागुराम कवडे, सौ सुनीता शिवाजी भदर्गे,श्री बबन मिसाळ, सौ रुक्मिणी गजानन कवडे, श्री गुलाब बापूराव कवडे, सौ यमुना भागवत कोकाटे, श्री गंगाराम पुंजाराम कोकाटे, हनुमान थोरे  यांची पालकांमधून बिनविरोध निवड करण्यात आली. श्री गणेश दादाराव कणसे यांची ग्रामपंचायत मधून सदस्य पदी तर श्री अशोक गुलाबराव बेरगुडे यांची शिक्षणप्रेमी सदस्य म्हणून तर श्री विशाल रमेश गोरे यांची शिक्षक प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. समिती सचिव पदी श्री एम व्ही काळे, मुख्याध्यापक हे राहतील.
सदर समिती निवड बिनविरोध व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.तसेच शाळेच्या विकासासाठी व गुणवत्तेसाठी सर्वजणांनी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी माजी अध्यक्ष श्री विठ्ठल नरवडे, श्री परमेश्वर रेपे, माजी उपाध्यक्ष श्री अशोक मुकादम, शिक्षण प्रेमी श्री बंडूभाऊ रेपे, श्री शाम नाना चव्हाण श्री अशोक बेरगुडे, श्री बंडू रायकर,गोवर्धन नवल, सुंदर सांगोळे, टोपाजी कोकाटे,दत्ता घोडे,सुनील सदावर्ते, पालक व नागरिक उपस्थित होते.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती