परतूर शहरात कवी भिवराजी आढाव स्मृती साहित्य संमेलनाचे आयोजन

१३ जानेवारीला रंगणार साहित्य मेळा 
परतूर प्रतिनीधी  ने
  येथील आविष्कार साहित्य मंडळाच्या वतीने येत्या १३ जानेवारी रोजी कवी भिवराजी आढाव स्मृती २० व्या एक दिवसीय मराठवाडा स्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील विवेकानंद विद्यालयाच्या प्रांगणात स्व.अरुणराव बागल साहित्य नगरीत पार पाडणाऱ्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सुप्रसिध्द साहित्यिक प्रा.डॉ. प्रल्हाद लुलेकर भूषविणार आहेत.
    संत साहित्याचे अभ्यासक, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. मुरहरी केळे यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. प्रतिभा गोरे, महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय सरग, पोलीस निरीक्षक एम.टी. सुरवसे, प्राचार्य डॉ.भारत खंदारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता एस.बी. मठपती, चंद्रकांत खाडे, विजय रावणकर, प्रकाश यात्रीचे संपादक डॉ. शिवाजी तिकांडे, यश ग्रुपचे बालासाहेब आकात, लायन्स क्लबचे मनोहर खालापुरे, डॉ. गुलाबराव नजन, अतिरिक्त कार्यकारी अभियंता विश्वनाथ लहाने, आर.एन. सोनत, दीपक माने, डॉ.गुलाबराव नजन, भाऊसाहेब देशमुख यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महावितरणचे परतूर येथील उपकार्यकारी अभियंता निलेश बेंडाळे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. 
सकाळी साडे ९ वाजता गंज शाळा ते संमेलन स्थळ दरम्यान ग्रंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी साडे १० वाजता मुख्य उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्या नंतर प्रा. छबुराव भांडवलकर लिखित ' 'धनगराचं पोर' या कवी भिवराजी आढाव चरित्र ग्रंथाचा प्रकाशन सोहळा मान्यवरांच्या हस्ते पार पडणार आहे. 
दुपारी दीड वाजता आयोजित कथाकथन सत्राच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा.राम निकम तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक प्रा.रावसाहेब ढवळे उपस्थित राहणार आहे.साहित्यिक बसवराज कोरे, पाराजी झुटे,प्रा. छबुराव भांडवलकर, किशोर बोर्डे, बबन आखाडे, आशिष गारकर, अजय देसाई आदी कथाकार आपली कथा यावेळी सादर करणार आहेत.
सायंकाळी पाच वाजता आयोजित कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिध्द कवी डॉ.महेश खरात असणार आहेत तर कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. डॉ.धोंडोपंत मानवतकर, प्रा.डॉ.अशोक पाठक, प्रा. सुरेश हिवाळे, शरद ठाकर, प्रदीप देशमुख, सदाशिव कमळकर, लक्ष्मीकांत दाभाडकर, प्रदीप इक्कर, आत्माराम कुटे, राहुल पंडागळे, मिलिंद अवसरमोल, प्रा.डॉ.सखाराम टकले, अजय देसाई, श्रावणी बरकुले, हरिभाऊ कवडे, सुचिता कुलकर्णी, रवींद्र गायकवाड, सुचिता जोशी, कृष्णा सोनवणे, कैलास जगताप, विठ्ठल चव्हाण,शिवहरी डोळे, शुभम पांगरकर, सरिता गुंजकर आदी कवी आपल्या कविता सादर करणार आहेत. 
सायंकाळी ५ वाजता 'महाराष्ट्राची लोकधारा' हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी सात वाजता आयोजित समारोप सत्राच्या अध्यक्षस्थानी कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.मधुकर सोळसे, प्रा. कावेरी खुरने यांची उपस्थिती राहणार आहेत. 
साहित्य संमेलनाला जास्तीत जास्त साहित्यिक मंडळींनी उपस्थित राहावे असे आवाहन आविष्कार साहित्य मंडळाचे माजी प्राचार्य डॉ. भगवानराव दिरंगे, कल्याण बागल, रमेश आढाव, डॉ. भानुदास कदम, डॉ.संदीप चव्हाण, प्रा. छबुराव भांडवलकर, आशिष गारकर, डॉ. संजय पुरी, राजकुमार भारुका, बालाजी ढोबळे, ॲड. विशाल बागल, अजय देसाई, अर्जुन पाडेवार, किशोर बोर्डे, शिवाजी मावकर यांनी केले आहे.

Popular posts from this blog

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश