परतूर तालुक्यातील सातोना खुर्द येथील, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत तसेच कर्मचाऱ्यांची निवासस्थाने 06 कोटी022 लाख रुपये किमतीच्या कामाचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते उद्घाटन,सातोना, शेलगाव, हनवडी येथे सभा मंडप, शादीखाना आदी 68 लक्ष रुपये किमतीच्या कामाचे लोकार्पण व भूमिपूजन



प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
जनतेला उत्तम आरोग्याच्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता एन एच एम अंतर्गत सातोना येथे उच्च दर्जाचे 06 कोटी 22 लक्ष रुपये किमतीचे आरोग्य केंद्रा च्या इमारतीचे व कर्मचारी निवासस्थानाचे बांधकाम केंद्रीय मंत्री भारतीताई पवार राज्यातील मंत्री तानाजी सावंत यांच्या माध्यमातून मंजूर करून आणले असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केली
ते सातोना ता परतूर येथे आरोग्य केंद्राची इमारत कर्मचारी निवासस्थाने, सिमेंट रस्ता बांधकाम, 25 लाख रुपये किमतीच्या शादी खाना लोकार्पण, तसेच शेलगाव येथील दलित वस्ती अंतर्गत 10 लक्ष रुपये किमतीचे सभामंडप, आमदार निधीतील 08 लक्ष रुपयांच्या सभा मंडप लोकार्पण तसेच पेवर ब्लॉक बसवणे, तर हनवडी येथे आठ लाख रुपये किमतीच्या आमदार निधीतील सभामंडप लोकार्पण प्रसंगी बोलत होते
पुढे बोलताना ते म्हणाले की, परतुर विधानसभा मतदारसंघांमध्ये आरोग्याच्या उत्तम सुविधा निर्माण व्हाव्यात याकरिता, आपण परतुर येथे 100 खाटांचे (60रू किमतीचे) तर मंठा येथे 50 खटांचे (60 लक्ष रु किमतीचे) उपजिल्हा रुग्णालय मंजूर करून आणले असून लवकरच त्याचे काम सुरू होईल 
तर सातोना व श्रीष्टी येथे अनुक्रमे 06 कोटी रुपये असे 12 कोटी रुपयांची दोन्ही आरोग्य केंद्रे मंजूर करून घेतली असल्याचे आमदार लोणीकर यांनी बोलताना स्पष्ट केले
पुढे बोलताना ते म्हणाले की मोदीजींनी गाव चालू अभियानाची हाक दिली असून, या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या बूथ व्यवस्थापनाबरोबरच सर्वसामान्य जनतेसाठी दिलेल्या विविध लाभांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पदाधिकारी कार्यकर्त्यांची असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी नमूद केले
पुढे बोलताना माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर म्हणाले की परतुर विधानसभा मतदारसंघातील 50 गावांमध्ये दलित वस्ती अंतर्गत सभामंडपाचे बांधकाम मंजूर करून आणत या 50 गावांमध्ये लवकरच हे काम सुरू होणार आहे तर हे करत असतानाच विविध माध्यमातून परतुर विधानसभा मतदारसंघातील तीनशे गावांमध्ये आपण सभामंडपांचे बांधकाम केले असून या सभा मंडपाच्या माध्यमातून विविध धार्मिक सांस्कृतिक छोटे-मोठे कार्यक्रम साजरे केले जातात याचा आपल्याला आनंद असल्याचे यावेळी बोलताना ते म्हणाले
पुढे बोलताना ते म्हणाले की सातोना येथे 279 घरकुल मंजूर करण्यात आलेली आहेत तर शेलगाव येथे 108 विविध योजना तील घरकुल मंजूर आहेत, त्याचबरोबर हनवडी येथे 34 घरकुल मंजूर असून आज प्रातिनिधिक स्वरूपात काही घरकुलांचे भूमिपूजन आपण करत असून लवकरच सर्वच घरकुले बांधकाम प्रत्यक्षात सुरू होणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले
पुढे बोलताना ते म्हणाले की मोदी सरकारची महत्त्वकांक्षी योजना ही सर्वसामान्य जनतेच्या आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची योजना असून आयुष्यमान भारत या योजनेच्या माध्यमातून पाच लाख रुपयांची मदत सर्वसामान्य गोरगरीब कुटुंबांना मिळत असून प्रत्येकाने आयुष्यमान भारत कार्ड काढून घेण्याचे आवाहन यावेळी त्यांनी उपस्थितांना केले
विविध विकास कामांसाठी मराठवाड्यात सर्वाधिक निधी आपण खेचून आला असून, घरकुल योजनेतही मंठा तालुक्यात 15000 च्या वर विविध घरकुलांचे प्रस्ताव निश्चितपणाने मंजूर करणार असल्याचे यावेळी त्यांनी बोलताना नमूद केले
यावेळी कार्यक्रमाला तालुका अध्यक्ष शत्रुघ्न कणसे, विलासराव आकात राजेश मोरे रवींद्र सोळंके, भगवान आरडे, सिद्धेश्वर सोळंके तुकाराम सोळंके, गजानन लिपणे, रामदास घोंगडे पद्माकर कवडे विठ्ठल बिडवे नारायण बिडवे प्रभाकर खंदारे बंडू मानवतकर रंगनाथ रेंगे रमेश चव्हाण रोहन आकात, विक्रांत लिपणे, छत्रपती थोरात, बाबासाहेब पवार यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले