पुर्णेतील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ ,सी सी टी व्ही बसवण्यात कानाडोळा ?
तळणी प्रतिनिधी रवी पाटील
मंठा तालुक्यातील तळणी परिसरातील पुर्णा नदीकाढच्या सासखेडा येथील पहिल्या वाळू विक्री डेपोचा शुभारंभ मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते ( ता. १० ) रोजी करण्यात आला. या वाळू विक्री डेपोमुळे सर्वसामान्यांना ६०० /- रुपयांत वाळू मिळणार असली तरी लिलाव होऊन दोन महिन्याचां कालावधी लोटला आहे .
अजुन तळणी आणि टाकळखोपा येथील डेपो चालू होण्याच्या प्रतिक्षेत आहे खरे तर तळणी येथील डेपो सुरवातीला चालू होने अपेक्षीत होते . सासखेडा येथून वाळू वाहतुकीचा अतिरीक्त खर्च टेम्पो धारक घेण्याची शक्यता नाकारता येत नाही विदर्भ व तळणी परीसरासाठी तळणी डेपो सुरु करणे सोईच होते
मंठा तालुक्यातील पुर्णा नदीकाढच्या सासखेडा , टाकळखोपा , तळणी या वाळू विक्री डेपो सुरू होणार आहे . यांपैकी सासखेड्यातील पहिल्या वाळू विक्री डेपोचा ( ता. १० ) शनिवारी सकाळी ११ वा. मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजाभाऊ तांबे , राहूल दिघे , बंडुनाना बेंद्रे , सरपंच अजय जाधव , लक्ष्मण जाधव , मुरलीधर देशपांडे , शिवाजी खंदारे , अमित तांबे , बन्टी तांबे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती .
संबधीत लिलाव धारकांने उत्खननाच्या वेळी नदी पाञात सी सी टी व्ही लावणे बंधनकारक असुन त्या उत्खननाचा व वाहतूकीचा अहवाल विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी याना दर पधरा दिवसाला पाठवणे बंधनकारक आहे तरी सुध्दा तहसीलदाराने उदघाटन केले कसे ?
वाळू डेपोमूळे चोरीला आळा बसेल - जोंधळे
सासखेडा ( ता. मंठा ) येथील वाळू डेपोमुळे सर्वसामान्यांना स्वस्तात वाळू उपलब्ध होणार असून वाळू डेपो सुरू झाल्यामुळे सर्वसामान्यांना शासन भावात वाळू मिळेल वाळू साठा करणार्या वाहनांना जीपीआर एस प्रणाली आवश्यक आहे तशा सुचना देण्यात येतील
सोनाली जोंधळे - तहसीलदार मंठा
एका टेम्पोवर कारवाई ...
पुर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन करून तळणी मार्गे लोणारकडे विना क्रं. दोन ब्रास वाळू वाहतूक करणारा टिप्पर शिरपूर पाटीजवळ मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी ( ता. ९ ) रोजी रात्री १० वा. पकडला. या पथकांत तळणी मंडळ अधिकारी समावेश होता . या पकडा पकडी च्या खेळात टेम्पो चा पाठलाग करत असताना तळणी येथे चालू असलेल्या अंखड हरीनाम सप्ताह च्या किर्तनात मोठा व्यत्यय आणला