अवैध वाळू वाहतुकीचा हायवा पकडला खबर-यांना चकमा देत तहसीलदारांची कारवाईतळणी प्रतिनिधी रवी पाटील 
  मंठा तालुक्यातील टाकळखोपा - सासखेडा गावंच्या हद्दीतील पूर्णा नदीपात्रातून वाळू उत्खनन करून चोरट्या मार्गाने वाळू वाहतूक हायवा तहसीलदारांनी ( ता. ११ ) रोजी रात्री ११ वाजेदरम्यान पकडला . विषेश म्हणजे , ठिकठिकाणी वाळू चोरांचे खबरे ठाणं मांडुन बसलेले असतांही तहसीलदारांनी खबऱ्यांना चकमा देत हायवावर कारवाई केली . 
छ. संभाजीनगर येथे रविवारी महाराष्ट्र राज्य महसुलतलाठी संघटनेचे १९ वे राज्यस्तरीय अधिवेशन होते. या अधिवेशनाला तलाठी गेल्यामुळे व तहसीलदार रविवारी सुट्टीवर असल्याचा फायदा घेत पुर्णा काठच्या सासखेडा -टाकळखोपा गावांतुन रात्रंदिवस अवैध वाळू उत्खनन करून वाळू साठ्यांवरुन वाहतूक बिनबोभाट सुरू होती . या अवैध वाळू वाहतुक सर्दभात ग्रामस्थांनी तहसीलदारांकडे तक्रारी केल्या होत्या. मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी सुट्टीवर असतांनाही महसुल च्या काही कर्मचार्याना सोबत घेऊन खाजगी वाहनांचा आधार घेत चक्क विदर्भ मार्ग येत टाकळखोप्यातुन अंदाजे ५ ब्रास वाळू वाहतूक करणारा हायवा क्रं. एम एच २८ बीबी ५९८९ याला दत्तमंदिर रविवारी रात्री ११ वाजेदरम्यान पकडले . या कारवाईनंतर वाळू चोरांनी तहसीलदारांवर दबाव आणत हायवा पळून नेण्याचा प्रयत्न केला . मात्र , तात्काळ पोलीसांची मद्दत घेत अखेर कारवाई केली .
कारवाईत महसुल प्रशासनाकडून सातत्य दिसुन येत नाही नव्याने रुजू झालेल्या तहसीलदार अवैध वाळू उपसा रोखण्यात काय उपाययोजना करतात हे लवकर कळेल बैठे पथकाची कायमस्वरुपी नियुक्ती केली तर यावर काही प्रतिबंध लागू शकतो 

टाकळखोपा, सासखेडा, कानडी, लिबंखेडा ,वाघाळा ईचा , देवठाणा , किर्ला , भुवन , वझर सरकटे , आदी पूर्णा काठच्या नदीपाञातून बेसूमार वाळू उपसा सुरुच आहे जवळपास दिडशे ते दोनशे वाहनानी नदी पाञातील उत्खनन जेसीबी यञा द्वारे चालू आहे .

कैलासचद्र वाघमारे याच्या कार्यकाळात वाळू चोरीला पूर्णपणे लगाम लागला होता महसुलच्या अनेक कर्मचार्याचे वाळूचोराचे संबंध सगळ्यांना परीचीत आहे वाळू चोरांना आम्ही येत असल्यापर्यत्नतचा निरोप देण्यात येत असल्याने कारवाया होत नाही 

अवैध वाळू उपश्यास प्रतिबंध घालावा आतापर्यन्त झालेल्या उत्खननाची इ टी एस मोजणी करावी व संबंधीत महसुल च्या कर्मचार्यावर कारवाई करावी यासाठी आजपासुन झानेश्वर राठोड यांनी पूर्णा पाटीवर उपोषण सुरू केले आहे वाघाळा टाकळखोपा इंचा तळणी आदी ग्रामस्थाचा या उपोषणाला पाठीबां दर्शवीला आहे

कारवाईची महाखनिज ॲपवर नोंदणी 
रात्रीच्यावेळी हायवा पकडल्यावर महाखनिज ॲपमध्ये जायमोक्यावर आँनलाईन पंचनामा करून कारवाईची नोंदणी केली. त्यानंतर हायवा पोलीसांच्या ताब्यात दिल्याचे तहसीलदार सोनाली जोंधळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले .

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले