एनएमएमएस शिष्यवृत्ती पात्र परीक्षेत कन्या विद्यालयाचे यश
परतूर – प्रतिनिधी कैलाश चव्हाण
महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांच्याकडून राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विध्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना पात्रतेसाठी घेण्यात येणार्या एनएमएमएस परीक्षेत परतूर येथील लाल बहादुर शास्त्री कन्या विद्यालयाच्या चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन आहे.
एनएमएमएस परीक्षा ही राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी घेतली जाणारी शिष्यवृत्ती परीक्षा आहे. शिष्यवृत्ती परीक्षा पात्र परीक्षेत गायत्री कणसे, गायत्री साबळे, कोमल सोनटक्के या तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीस पात्र ठरल्या आहेत. त्यांना दरवर्षी बारा हजार रुपये प्रती विद्यार्थ्यांना चार वर्ष शिष्यवृत्ती मिळणार आहे.
या एनएमएमएस परीक्षेत कन्या विद्यालयाचे गायत्री कणसे, गायत्री साबळे, कोमल सोनटक्के, वैष्णवी शेंडगे, या चार विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.
या यशाबद्दल मुख्याध्यापक संजय जाधव, शिक्षक शाम कबाडी, कैलास खंदारे,रामराव घुगे,योगेश बरीदे, अनिल काळे.रामप्रसाद नवल, सचिन कांगने, बळीराम नवल, सुरेश मसलकर, श्रीमती वृंदा डक,आणि प्रल्हाद कणसे, उद्धव कणसे, पुंजाराम कणसे,संपत टाकले, प्रशांत बेरगुडे, शामराव चव्हाण, अंकुश कणसे, जीवाजी शिवतारे, संतोष रेपे,आदींनी कौतुक केले आहे.