संस्कृतीचे जतन व देशाचे भवितव्य घडविण्यासाठी स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांसाठीहक्काचे व्यासपीठ : आ. बबनराव लोणीकर


 परतुर प्रतीनिधी कैलाश चव्हाण
    शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन हे विद्यार्थ्यांसाठी एक हक्काचे व्यासपीठआहे. अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळून संस्कृतीचे जतन होते व उद्याचे कलाकार पुढे येत असतात. सर्वच विद्यार्थी अभ्यासात हुशार नसतात; काही विद्यार्थी मागे असले तरी
त्यांच्यातील एखादा कलागुण त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडून आणतो. असे गुण शोधण्याची संधी या कार्यक्रमातून शिक्षकांना मिळतअसते.
त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे हे कलागुण वेळीच हेरून त्यांना वाव दिल्यास निश्चितच ग्रामीण भागातून चांगले कलाकार पुढे येतील व देशाचे भविष्य घडविणारी पिढी निर्माण होईल, असे मत माजी मंत्री तथा आ. बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केले.
 येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल येथे शुक्रवारी आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. त्यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा. दिनकरराव चव्हाण तर प्रमुख उपस्थितीमध्ये मा. संदीप बाहेकर, मा. शत्रुघ्न कणसे, मा.सिताराम नाना काकडे, मा.कल्याण बागल, मा.प्रकाश ढवळे गटशिक्षणाधिकारी मा. संतोष साबळे, नगरसेवक मा. प्रकाश चव्हाण, मा. राजेश भुजबळ, मा. कृष्णा आरगडे,मा. प्रवीण सातोणकर, मा. विजय नाना राखे, मा. संपत टकले, मा बाबासाहेब गाडगे, संस्थेचे संचालक मा.सुबोध चव्हाण, मा.संतोष सौ.भाग्यश्री चव्हाण मा.सचिन चव्हाण आदींची उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांनी विविध लोकगीते, देशभक्तीपर गीत, नाटिका सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी चालू शैक्षणिक वर्ष विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला तसेच संस्थेच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनी मनीषा काळे व पत्रकार अशोक गारकर यांनी यूजीसी नेट परीक्षेत यश संपादन केल्याबद्दल त्यांचा मान्यवराच्या हस्ते गौरव करण्यात आला.
 सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी शिंगारे व आलिया सय्यद यांनी प्रास्ताविक प्राचार्य गजानन कास्तोडे, तर आभार प्रदर्शन स्वाती काळे यांनी मांडले. कार्यक्रमासाठी प्राचार्य गजानन कास्तोडे, वंदना ककरिये, नयना जईद, मीनाक्षी शिंगारे, आलिया सय्यद, मनीषा लहाने, मनीषा लाळे, शिवानी दसमले, मोनिका लहाने, मंगल वेढेकर, अंबिका शेटे, स्वाती काळे, मंजुषा पोरवाल, धनंजय पावले प्रदीप चव्हाण, प्रदीप साळवे, बाळासाहेब कदम, सचिन जगताप, राजेश कार्लेकर आदींनी
परिश्रम घेतले आहे.

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले