मनुष्याने परमार्थ हा स्वःतच्या कल्याणा करता केला पाहीजे -ह भ प रामभाऊ महाराज राऊत

तळणी प्रतिनिधी रवी पाटील 
   येथुन जवळच असलेल्या बन येथे श्री संत भगवान बाबा व श्री संत वामन भाऊ यांच्या पूण्यतिथी निमित्य सात दिवसीय अखड हरीनाम सप्ताह ची सांगता काल ह भ प रामभाऊ महाराज राऊत आंळदी यांच्या काल्याच्या किर्तनाने सांगता झाली 

जगदगूरू श्रीमंत तुकाराम महाराज यांच्या माझे गडी कोण कोन 
निवडा भिन्न यातुनी I
आपआपणामध्ये मिळो |
एक खेळो एकाशी ॥धा
या अभगवावर महाराजांनी चितन केले मनुष्याने परमार्थ हा स्वःतच्या कल्याणा करता केला पाहीजे दुसर्याना तो दाखवण्यासाठी करु नये परमार्थीक चितंन चितं नच मनुष्याच्या उद्धाराचे साधन आहे . मोठया मनुष्याजवळ आल्यावर मनुष्याने नम्रतेने आले पाहीजे श्रीमंत जगदगुरू तुकाराम महाराजांनी . भगवंताला गोपाळाना उद्देशून केलेली सूचना आणि त्या सू


चनेचा भाव व्यक्त केला आहे ।भगवंताने जिथे अवतार घेतला ति जागा मथुरा होती भगवंताला मथूरेतून गोकूळात याव लागल . नंदाच्या घरी घेऊन जा म्हणून याचा साक्षात्कार वासुदेवाला झाला . 
तुकोबारायांचे अभंग म्हणजे जिवनाचे फलित आहे त्यांचा भाव समजुन घ्या आणि स्वःत उध्दार करून घ्या चारशे वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला . आहे . प्रत्येक अभंगाचा भाव समजायला आपले आयुष्य देखील कमी पडेल .मनुष्यान व्यावहारीक जीवनात कितीही काटे मारले तरी त्याच्या प्रारब्धात जेवढे मिळायचे तेवढेच मिळणार फक्त काटा मारण्याच पाप क्रीया मानात जमा झाल्याशिवाय राहणार नाही 

मनुष्याने जीवन जगत असताना सावधान असले पाहीजे लोभामुळे दुसर्यावर अन्याय करून अधिक मिळवण्याचा प्रयत्न करु नये कारण शास्त्राचा सिद्धांत आहे जे प्रारब्धात आहे तेवढे मिळणारच . तुम्ही कितीही विहीत मार्गाने जरी मिळवीले तरी सुध्दा प्रारब्धा पेक्षा जास्त मिळू शकत नाही निशिध्द मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा प्रारब्धात आहे तेवढेच मिळणार तुम्ही विशीष्ट मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न केलाच तर पाप झाल्याशिवाय राहणार नाही 

ज्याच्या गळ्यात पविञ तुळशीच्या माळा आहेत त्यानी तरी पाप पुण्याचा विचार करणे गरजेचे आहे जे स्वःत ज्ञानोबा तुकोबा संत भगवान बाबा वामन भाऊ यांचे अनुयाई समजतात त्यानी तरी पाप पूण्याचा विचार करावा 

देव गोकुळात आल्यावार खेळण्यात दंग होते कारण त्या खेळण्यात देव आहे .व खेळण्यातच देव आहे त्या खेळण्यात पैसा नाही ज्या गोष्टीत पैसा येतो त्यात आंनद येत नाही कलयुगात पैशाचे प्रारब्ध वाढले आहे कोणत्याही क्षेत्रात पैश्यावाचून राहीले नाही पूर्वी जीवनात पैश्याला महत्व नसायचे ज्याच्या जीवनात पैश्याला महत्व आहे त्याच्या जीवनाच आंनद नाही असे महाराजांनी सांगीतले 

राऊत बाबा याचे कीर्तन म्हणजे एक पर्वणीच असते बन सारख्या छोट्या गावात महारांजानी सेवा दिल्याने पंचक्रोशीतील नागरीकांनी तुफान गर्दी या कीर्तनासाठी केली होती

Popular posts from this blog

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती

न्यु वंडर किड्स इंग्लीश स्कूल विघार्थ्याचे यश

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले