कला हि हृदयाची भाषा आहे. हभप रुपालीताई सवने ,छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
प्रत्येकाच्या मनात एक कलाकार दडलेला असतो. कला हि एक हृदायाची भाषा आहे. कला सादर करतांना ती हृदयातून सादर करण्यापासून सूरू होते. विद्यार्थ्यांत दडलेले सुप्त गुण सादर करण्याचें व्यासपीठ हे शालेय जीवनातून सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून होत असते. अश्या सांस्कृतीक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुलांच्या कला गुणांना वाव मिळणार असल्याचे प्रतिपादन सुप्रसिद्ध कीर्तनकार हभप रुपालीताई रामेश्वर महाराज सवने यांनी केले. त्या छत्रपती शिवाजी मिशन इंग्लिश स्कूमध्ये आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतीक कार्यक्रमात प्रमुख पाहुण्या म्हणुन बोलत होत्या. यावेळी या* *कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणुन मंदाताई लोणीकर उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर आर.आर तायडे, हभप रामेश्वर महाराज सवने, संजय अवचार, श्रीमंती वायाळ उपस्थीत होत्या. यावेळी या सांस्कृतीक कार्यक्रमात लहान चिमुकल्यांनी हिंदी, मराठी, देशभक्तीपर, बहारदार गीत उपस्थितां समोर सादर केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सुवर्णा अवचार यांनी केले. तर सूत्रसंचालन आत्माराम बोलसुरे यांनी केले. सदरील सांस्कृतीक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षिका सुवर्णा चव्हाण, निकिता पतंगे, अनिता बोलसुरे, सेविका चंदा हिवाळे यांनी परिश्रम घेतले. तर आभार मुख्याध्यापिका सुवर्णा अवचार यांनी मानले.