घरात माणस आहेत तोपर्यंतच काळजी घ्या- शिवकथा चार्य ह. भ. प. समाधान महाराज शर्मा.

कथेतील रंगत वाढली, परतुरात भाविकांची मांदियाळी.
परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
घरात माणस आहेत तोपर्यंतच त्यांची काळजी घ्या मेल्यावर काय आठवण काढता, अन माळवदावर नैवेद्य ठेवता, सुनांनो आईला जसं तासन तास फोनवर बोलतात तसंच पतीच्याही आई-वडिलांना जपा. असा संदेश शिवकथाचार्य हभप समाधान महाराज शर्मा यांनी कथेच्या तिसऱ्या दिवशी श्रोत्यांना दिला.
शहरात माजी आमदार सुरेश कुमार जेथलिया यांच्या परिवाराच्या वतीने भव्य शिवकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. आज तिसऱ्या दिवशी शिव कथेचा विस्तार करताना ह. भ. प. समाधान महाराज शर्मा हे बोलत होते. ते म्हणाले की कथा जीवनाची व्यथा दूर करते. त्यामुळे दैवतांच्या, थोर पुरुषांच्या कथा ऐकत चला, त्या आत्मसात करा. शिक्षण कधीही चांगलं मी पाया पडून सांगतो मायबाप लेकरांना उच्चशिक्षित करा पण हिंदू धर्माचे संस्कार त्यांच्यामध्ये रुजवा. शिक्षणातून मुले संस्कारित झाली पाहिजेत. लेकर जेव्हा पळून जातात तेव्हा त्या वेदना त्या मायबापांना विचारा. आपल्या मुलीला मुलगा बघतांना बाप त्याची संपत्ती खानदान गुण सर्व बघून देतो आणि तुम्ही एखाद्या नालायकासोबत पळून जातात लाजा वाटत नाहीत का, हे दुःख कळण्यासाठी मायबाप व्हावं लागेल. आई वडिलांनीही लेकरांना वेळ द्यावा पैसा व संपत्तीच्या हव्यासापायी संतती बिघडता कामाने बिघडता कामा नये. लेकरांना दुखात एकट सोडू नका. माणस आहेत तोपर्यंत घरात माणस आहेत तोपर्यंत त्यांची काळजी घ्या मेल्यावर आठवण काढून काय उपयोग. असा प्रश्न यावेळी ह भ प समाधान महाराज शर्मा यांनी उपस्थित करून मुली जशी आपली माहेरची माणसं जापतात तशीच सासरची ही जपा. वास्तव नेहमी विस्तावा सारखा असतं आग लागते. चांगलं जगलं आणि चांगलं वागलं तरच चांगलं होईल बाकी कशाने चांगलं होत नाही ज्याच्या मनात पाप आहे त्याच्याच मोबाईलला लॉक आहे. मोबाईलचा वापर कमी करा असा संदेश देऊन, रुद्राक्षाचे प्रकार, त्याचे महत्त्व,भोग व मोक्ष शंकराच्या पूजेची वेळ व जप, विकार याविषयी माहिती सांगून शिव कथेतील प्रसंग श्रोत्यापुढे ह.भ.प. समाधान महाराज शर्मा यांनी उभे करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.याप्रसंगी उपस्तिथीमध्ये ह.भ.प.गजानन म. शास्त्री, ह.भ.प.रुपालीताई सवणे,मा.ना.अर्जुनराव खोतकर,राजेशजी विटेकर,प्रल्हादराव बोराडे, शिवजी बजाज, किसनराव मोरे, विक्रमनाना माने,बाबाजी गाडगे,सचिन लिपने,पांडुरंग गाडगे,दिलीपराव चव्हाण,विष्णू चव्हाण,महादेव घेबडं,अंबादास कायंदे, तळेकर बापू, माऊली डव्हारे आदी उपस्तिथ होते.

नरदेह मिळाला संधीच सोन करा - ह. भ.प. अक्रूर महाराज साखरे.
जन्म हा संधीच सोनं करण्यासाठी असतो. तुम्हाला नरदेह मिळाला त्याचा व्यसनाधीनतेच्या आहारी जाऊन कोळसा करू नका असा उपदेश ह भ प अक्रूर महाराज साखरे यांनी आपल्या कीर्तनातून दिला.
परतूर शहरात माजी आ. सुरेश कुमार जेथलिया यांनी शिवकथा व कीर्तन सोहळ्याचे आयोजन केले आहे. यावेळी अक्रूर महाराज जन्मा आलो, त्याचे आजी फळ झाले साचे, या तुकाराम महाराज अभंगावर किर्तन सेवा करीत होते. अक्रूर महाराज पुढे म्हणाले की, तुम्हाला मिळालेला नरदेह हा दुर्मिळ आहे किती ही धन देऊन अर्धा क्षण सुद्धा आयुष्य मिळत नाही संतांनी नरदेह प्राप्त केला शरीर जिंकले. ग्रंथ तयार केले. काळावर विजय मिळवला त्यामुळे कोणाच्या नादी लागू नका ज्ञानेश्वरी घरी आणा, भाव धरून ती वाचा भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न करा असेही शेवटी अक्रूर महाराज यांनी सांगितले.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....