बचत गटाच्या महिलांनी बँकेच्या अर्थसहाय्य घेऊन प्रगती साधावी. -- मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी
सोयंजना येथील परमार्थ आश्रम येथे महिला मेळावा संपन्न
परतूर -- प्रतिनिधी कैलाश चव्हाण
बचत गटाच्या महिलांनी स्टेट बँकेचे अर्थसहाय्य घेऊन आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती साधावी असे
आवाहन भारतीय स्टेट बँकेचे मुख्य शाखा व्यवस्थापक अतुल सावजी यांनी केले. ते सोयंजना येथील परमार्थ आश्रमावर महिला बचत गटांच्या मेळाव्या प्रसंगी बोलत होते. त्यावेळी पुढे बोलतांना सावजी म्हणाले की बँ
केने महिला बचत गटांना दिलेल्या कर्जाची परतफेड नियमित केल्याने महिला गटाची प्रगती निश्चित आहे. बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना दिलेले अर्थ सहाय्यातून महीला बचत गट यशस्वी चालवत अनेक गटांनी प्रगती साधली आहे. महिलांनी आपला प्रपंच चालवताना काटकसर करुण कुटुंबाची बचत करावी.
नियमित कर्ज फेड करणाऱ्या व्यावसायिक बचत गटाच्या महिलांना लखपती दीदी योजने अंतर्गत लखपती महीला योजनाचा लाभ महिलांना दिला आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्यावर कुटुंबावर आलेले संकट हे मोठे संकट निर्माण झाल्याने त्यांच्यावर आलेले संकट हे कोणीही निवारू शकत नाही. त्यासाठी वीमा हि काळाची गरज आहे. महिलांनी दैनंदिन गरजा पूर्ण करीत असताना शासनाचा प्रधानमंत्री सुरक्षा वीमा योजना आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती वीमा योजनेत सहभागी व्हावे.
महिलांनी वीमा संरक्षण घेत आपल्या कुटुंबाला सुरक्षित करावे. तसेच उतार वयात वयाची साठ वर्षानंतर अटल पेन्शन योजनेत आपल्या कुटुंबाला सहभागी करून घ्यावे. उतार वयात पेन्शन निश्चित करुण घ्यावे. दहा वर्षांच्या खालील मुलीसाठी शासनाच्या सुकन्या समृध्दी योजना सहभागी व्हावे.असे आवाहन शेवटी सावजी यांनी केले आहे. त्यावेळी भारतीय स्टेट बँकेचे उपशाखा व्यवस्थापक मनोहर गावडे,श्रीनिवास महाराज, शिवलिंग महाराज मोरे उपस्थीत होते.
Comments
Post a Comment