छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरण संपन्न

 परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
दिनांक २८ फेब्र२०२४ रोजी न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल व ज्युनियर कॉलेज तर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आयोजित सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रमात घेण्यात आला 
     या कार्यक्रमात ठरविलेल्या विभागा नुसार विजेत्यास  भेटवस्तू व ट्रॉफी तसेच उत्तेजनार्थ आलेल्या विजेत्यास ट्रॉफी देऊन भव्य  सन्मानित करण्यात आले.  
गट क्रमांक अ १ ली ते ४ थी प्रथम क्रमांक मोनिका कैलास आनंदे (जि प मासेगाव), द्वितीय क्रमांक अर्नव माधव परसुरे (ज्ञानलता पब्लिक स्कूल, परतुर) आणि तृतीय क्रमांक हिंदवी संतोष झरेकर (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर) व गौरी तुकाराम धुमाळ (जि प शेवगा) 

गट क्रमांक ब ५ वी ते ७ वी प्रथम क्रमांक शशांक दत्ताराव काशिद (ज न वि, आंबा) द्वितीय क्रमांक पुनम कैलास लाळे (ज न वि, आंबा) आणि तृतीय क्रमांक जान्हवी गणेश जगताप (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर)

गट क्रमांक क ८वी ते १० वी प्रथम क्रमांक तनिष्का राजेभाऊ नवल (विवेकानंद स्कूल, परतुर)द्वितीय क्रमांक हर्षवर्धन पांडूरंग सोळंके (न्यू वंडर किड्स ईंग्लिश स्कुल, परतूर) आणि तृतीय क्रमांक हर्षद विलास काळे (ला ब शा, परतुर)

तसेच प्रत्येक गटातून दहा उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आली. 
  या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष  नारायणराव सोळंके तर प्रमुख अतिथि म्हणून  गणेश सोळंके, छाया बागल, सुरेश मोठे, काळबांडे सर, सुनील कासट, माधवमामा कदम, रंगनाथ भुतेकर, सुभाष बागल, उमेश बागल ईत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष हरकळ यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय चव्हाण यांनी केले.
    हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेखा ताजी, मीना गोरे, सविता कातारे, पुजा मोरे, गोविंद पाठक, महादेव कदम, बाळासाहेब बिडवे तसेच सेवक सोनू गायकवाड आणि सुखदेव सस्ते यांनी परिश्रम घेतले.

Popular posts from this blog

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

परतूर सेलू रोडवर मोटर सायकल झॉलो गाडीचा अपघात

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत