नगर परिषद परतुर मध्ये डिजिटल ॲप द्वारे टॅक्स भरण्याची सुविधा सुरू ....
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर नगरपरिषद हद्दी मधील मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारक तसेच गाळेधारक यांचेकडे किमान तीन कोटी पर्यंत थकबाकी असून अपेक्षित प्रमाणे लोकांद्वारे कर भरणा होत नाही आणि प्रत्येक वेळी रोख उपलब्ध नसल्याचे नवनवीन कारण लोक सांगत असल्याचे निदर्शनास येतात त्यामुळे मुख्याधिकारी श्री परदेशी यांनी क्यू आर कोड द्वारे ,डिजिटल ॲप द्वारे तसेच ऑनलाईन बँकिंग द्वारे कराचा भरणा करण्याबाबत आवश्यक त्या उपाययोजना करून वसुली पथकास डिजिटल पेमेंट वसूल करण्याकरिता बँकेद्वारे प्रशिक्षण देऊन वसुली मोहीम जोरात सुरू केली आहे.
शहरातील नागरिकांना प्रशासनामार्फत योग्य सुविधा देण्याचा मानस आणि ध्येय डोळ्यापुढे ठेवून न पा प्रशासन वसुली मोहीम जोरात राबवीत आहे त्या अनुषंगाने 31 मार्चपर्यंत अधिक सर मागणी आणि वसुली करण्यात येईल मात्र 31 मार्चनंतर थकबाकीदार कडून कठोर कार्यवाही करत वेळप्रसंगी मालमत्ता अटकाव करणे सील करणे, नळ जोडणी बंद करणे तसेच आवश्यकतेनुसार मोठ्या थकबाकीदारांचे नावे शहरातील मुख्य चौकात फलकावर लावणे वेळप्रसंगी ढोल ताशे वाजवून थकबाकीदारांचे मालमत्ते समोर वसुली पथक नेऊन उचित कार्यवाही करणे असे सर्व प्रकार अवलंबिण्यात येणार आहेत तरी शहरातील मालमत्ता धारकांनी पुढील कटू कार्यवाही टाळण्यासाठी आणि नगरपालिका प्रशासनास सहकार्य करण्याच्या दृष्टीने तातडीने रोखीने अथवा डिजिटल पेमेंट च्या माध्यमातून कराचा भरणा करावा व पालिकेला सहकार्य करावे असे मत मुख्याधिकारी श्री परदेशी यांनी व्यक्त केले.
वसुली मोहिमेत बाधा आणणाऱ्या कोणत्याही व्यक्ती ची परवा न करता आवश्यक त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाची मदत घेऊन योग्य कारवाई केल्या जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि पालिकेला सहकार्य करावे.
या वसुली पथकात काशिनाथ सावंत चंद्रकांत खनपटे अतुल देशपांडे दत्तात्रय बागल अजगर कायमखानी कल्याण पाठक केदार जाधव अनिल पारीख विजय सपकाळ राजू बागल आधी आदीं कर्मचारी चा समावेश आहे.