बुध्दिमत्ता व कौशल्याचा वापर करुन नवनिर्मिता करा '- प्राचार्य तथा अध्यक्ष एकनाथ कदम .
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
आनंद इंग्लिश स्कूल परतुर येथे विद्यार्थी प्रतिकृती प्रदर्शन संपन्न झाले. याचे उदघाटन रमाकांत बरीदे सर यांनी केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे ह.भ.प शेषनारायण महाराज इक्कर व संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य एकनाथ कदम उपस्थित होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उदघाटक रमाकांत बरीदे म्हणाले की,विद्यार्थांनी विज्ञानाचे प्रयोग ,नवनिर्मिती व शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची तयारी करावी.
याप्रसंगी मार्गदर्शन करतांना मा.एकनाथ कदम म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दिचा व कौशल्याचा वापर करुन नवनिर्मिती करावी व पालकांनी यासाठी सहकार्य करावे .
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सकस आहार, खडकांचे प्रकार, विविध सण उत्सव, वायूंची निर्मिती, इंग्रजी वाक्याची रचना व गणित विषयातील संकल्पना या विषयावर प्रतिकृती सादर केल्या.
प्रदर्शन पाहण्या साठी पालक व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्राचार्य नारायण सागुते यांनी केले तर प्रास्तविक सत्यशीला तौर यांनी केले .
कार्यक्रम यशस्वीते साठी सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.