सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी बॅचचे स्नेह मिलन संपन्न

परतूर प्रतीनीधी कैलाश चव्हाण
परतुर येथील जिल्हा परिषद प्रशाला शाळेतील सन 1998- 99 या वर्षातील दहावी झालेले विद्यार्थी सर्व वर्गमित्र व शाळेत शिकवणारे शिक्षक स्नेहमिलनाच्या कार्यक्रमातून एकत्र आले होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी 25 वर्षांपूर्वींच्या आठवणींना उजाळा दिला. 
        यावेळी शाळेत शिकवणारे शिक्षक वृंद उपस्थित होते  शिक्षक सेवानिवृत्त झालेले असले तरी त्यांना बोलवून त्यांचा आहेर व मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. 
     या शिक्षकांमध्ये  पाठक सर, सरफराज कायमखानी सर, इंगळे सर, नंद सर, जायभाये सर, देशपांडे सर,तायडे सर, खतीब सर, भराडे मॅडम, आत्ता कार्यरत असलेले मुख्याध्यापक राठोड सर व आठवे सर यांची उपस्थिती होती. 
        यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शिक्षकांबद्दल काही जुन्या आठवणींना उजळा दिला . व शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्याबद्दल बऱ्याच गोष्टींना, आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमांमध्ये काही विद्यार्थी आपल्या देशासाठी सेवा करून आलेले प्रशांत पुरी, राजेंद्र सोनटक्के भीमराव चाफे व तसेच काही उच्च पदावर गेलेले पीएचडी झालेले एकनाथ जाईद इजाज अली, डॉ. मुनीर कादरी अशा बऱ्याच जणांचा गुरुजनांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण मुंदडा, गणेश कानडे गणेश ओझा, सत्यम अग्रवाल ,श्रीपाद तरासे, प्रशांत पुरी, व शिवनंदा कवडे यांनी  प्रयत्न केले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष  पाठक सर तर प्रमुख पाहुणे म्हणून सर्व शिक्षक वृंद होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीपाद तरासे यांनी केले तर आभार नारायण मुंदडा यांनी मानले.

Comments