स्व. गजूभाऊ तौर यांच्या वाढदिवस सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्तिथ रहा - राम अवघड.
जालना प्रतिनिधी समाधान खरात
दि. 17 जुलै 2024 रोजी सामाजिक कार्यकर्ते
स्व. गजानन तौर यांचा वाढदिवस मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्यक्रम ठेऊन साजरा करण्यात येणार आहे. या प्रसंगी भव्य रक्तदान शिबीर मातोश्री लॉन्स, अंबड रोड येथे आयोजित करण्यात आले आहे, त्या नंतर 5000 वृक्ष वाटप कार्यक्रम होणार असून, आषाढी एकादशीच्या शुभ मुहूर्तवर स्व. गजानन भाऊ तौर फाउंडेशन 888 या सामाजिक संघटनेचे भव्य उदघाटन देखील करण्यात येणार आहे.
जालनातील प्रति पंढरपूर असलेल्या श्री. आनंदी स्वामी महाराज यात्रेत भाविक भक्तांना फराळ आणि फळ वाटप देखील करण्यात येणार आहे.
या प्रसंगी स्व.गजू भाऊ तौर यांच्या समर्थकांनी मोठ्या संख्येने उपस्तिथ राहून सर्व सामाजिक कार्यक्रमांची शोभा वाढवावी असे आवाहन राम अवघड आणि समस्त स्व. गजू भाऊ तौर मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.