देवगिरी ग्लोबल शाळेत अवतरली पंढरी ,चिमुकल्या बाळगोपाळांनी टाळ, मृदुंग, पताका घेऊन दिंडीत घेतला सहभाग


परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
  दि.१७ जुलै 2024 वार बुधवार रोजी परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूलमध्ये आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. 
  सर्वप्रथम शाळेचे संचालक श्री सुबोध भैय्या चव्हाण व संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण यांच्या हस्ते श्री विठ्ठल व रुक्मिणीची पूजा करण्यात आली. यावेळी सदाशिवराव कणसे व अनिलजी अग्रवाल यांची विशेष उपस्थिती होती.श्री विठ्ठल व रुक्मिणी ची पालखी देवगिरी शाळा ते शिवाजीनगर, महादेव मंदिर, मार्गे भाजी मंडई परतुर येथून विष्णू मंदिर येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी कपाळाला चंदनाचा टिळा, हातामध्ये टाळ, घेऊन वारकरी वेशभूषा धारण केली होती.लेझीम पथक, टाळ व मृदंगाच्या तालावर पाऊली खेळत, पताका नाचवत, फुगडी खेळत दिंडीत सहभाग घेतला. अनेक विद्यार्थ्यांनी श्री विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केली होती तर शाळेतील मुलांनी व मुलींनी पारंपारिक वेशभूषेत येऊन दिंडीची शोभा वाढवली.
यावेळी शाळेचे संचालक श्री सुबोध भैय्या चव्हाण, संचालिका श्रीमती भाग्यश्री चव्हाण, शाळेचे प्राचार्य जयकुमार तिमोथी , गजानन कुकडे, राजेश कार्लेकर, प्रदीप चव्हाण, विजय भापकर, प्रदीप साळवे, रमेश कदम, शाहीर शेख, मीनाक्षी भाग्यवंत, स्वाती काळे, मनिषा लहाने, त्रिवेणी गिरी, वंदना ककरीये, कोमल मोर, अश्विनी डोंबाळे, श्वेता पाठक, निकिता कदम, शिबा काजी इत्यादी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Popular posts from this blog

लाच स्वीकारताना कारला येथील ग्रामसेवक घुगे यांना रंगेहाथ पकडले

रायगव्हाण येथे शिव महापुराण कथेची अति उत्साहात सांगता....

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत