परतूर येथील रेणूका नगरीत अवतरली पंढरी,लहान बालक, वृद्धानी टाळ, मृदुंग, पताका घेऊन दिंडीत घेतला सहभाग
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
   परतुर येथील रेणूका नगर वासीयां कडून गेल्या तीन वर्षा पासून अंखंड  आषाढी एकादशी निमित्त दिंडीचे आयोजन करण्यात येते या ही वर्षी दिडी चे आयोजन करण्यात आले होते.                       
        रेणूका नगर येथील महिलांनी लाल साडी व पुरूषांनी पांढरा ड्रेस परिधान करीत  रेणूका नगर येथे श्री  विठ्ठल व रुक्मिणीची पूजा करण्यात आली.  त्या नंतर श्री विठ्ठल व रुक्मिणी ची पालखी रेणूका नगर,बालाजी मंदीर,महादेव मंदीर चौक,शिवाजी नगर या मार्गाने  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराकडे नेण्यात आली. यावेळी दिंडीत सहभागी भक्त मंडळीनी कपाळाला चंदनाचा टिळा, हातामध्ये टाळ, घेऊन वारकरी वेशभूषा धारण केली होती.ढोल ताशा सह टाळ व मृदंगाच्या तालावर पाऊली खेळत, पताका नाचवत, फुगडी खेळत दिंडीत सहभाग घेतला. या मधे  श्री विठ्ठल व रुक्मिणी यांची वेशभूषा परिधान केलेली चिमुकले हे राहभागी झाले होते तर शहरातील मोढा भागातील नागरीकानीही  पारंपारिक वेशभूषेत येऊन दिंडीची शोभा वाढवली.
       यावेळी गणेश जेथलिया विलास धुमाळ विजय बोराडे राधेश्याम तापडिया संतोष काकडे राहुल कदम कृष्णा कातारे कार्तिक बोराडे गणेश कासारे व महिला मंडळांनी  बाळ गोपाळ आदीनी दिडींत सहभाग घेतला शेवटी श्री विठ्ठल  रुक्मिणी मंदीर येथे दिंडीत सहभागी झालेल्या भक्तांचे आभार  आबासाहेब कदम यांनी मांनले तर  प्रस्ताविक अमर बगडिया यांनी केले
Comments
Post a Comment