देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती व बाळ गंगाधर टिळक पुण्यतिथी उत्साहात साजरी
परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
दि. 1 ऑगस्ट रोजी परतुर येथील देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल व भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात लोकशाहीर आण्णाभाऊ साठे जयंती व बाल गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री जयकुमार तिमोथी यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीस उजाळा दिला. शाळेच्या सहशिक्षिका स्वाती काळे यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील प्रसंग कथन केले. शाळेचे सहशिक्षक गजानन कुकडे यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान, त्यांचे कष्टमय जीवन यावर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या सहशिक्षिका मीनाक्षी भाग्यवंत यांनी केले तर आभार रमेश कदम यांनी मानले. यावेळी शाळेचे व महाविद्यालयाचे राजेश कार्लेकर, प्रदीप चव्हाण, त्रिवेणी गिरी, वंदना ककरीये, मनीषा लहाने, स्वाती काळे, शाहीर शेख, शिबा काजी, अश्विनी डोंबाळे, निकिता कदम, श्वेता पाठक, मीनाक्षी शिनगारे, व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.