परतूर येथील अदिवाशी अश्रम शाळेत रक्षा बंधन सण उत्साहात साजरा
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण
परतूर येथील अनु-आदिवासी आश्रम शाळा येथे (वर्ष 8 वे ) दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनचा सण उत्साहात साजरा करण्यात आला
सौ.राजश्रीताई शिवहरी डोळे या दरवर्षी अनु-आदिवासी आश्रम शाळा परतूर येथे मुलांना राखी बांधत आहे.
या सणाला भारतता फार महत्व आहे इतिहासात याचे आनेक दाखले बघायला मिळतात हा एक धागा नसून भाऊ बहिण्याचा अतूट प्रेमाची साक्ष हा सण देतो भारतीय संस्कुतीत रक्षाबंधनाचा सण महत्त्वाचा आहे. भावा-बहिणीचे अतूट नाते दर्शवणारा हा सण आहे. या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुसाठी प्रार्थना करते. तसेच भाऊही बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो.
राजश्रीताईला सख्खा भाऊ नसल्या कारणाने त्या मागील 8 वर्षा पासून आदिवासी मुलांसोबत रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहे.
आज रक्षाबंधणाच्या दिवशी त्यांनी 250 ते 300 भावासोबत हा सण साजरा केला